
Sanjay Raut :‘‘डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी स्वार्थ आणि आर्थिक लाभासाठी निर्णय घेतला आहे. ते पैलवान दिसत असले तरी ते कच्चं मडकं आहेत,’’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आज चंद्रहार यांच्या शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेशावर खरमरीत टीका केला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी चंद्रहार यांचा खरपूस समाचार घेतला.