मग अर्णवचा मृत्यू कशामुळे ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

अर्णवचे आई, वडील व मोठा भाऊ यांना विलगीकरण कक्षातून सोडल्यानंतर मेढा पोलिस आता अधिक चौकशी करणार आहेत. त्यातूनच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

मेढा (जि.सातारा) : जावळी तालुक्‍यातील म्हाते खुर्द येथील सोळा वर्षीय अर्णव जयवंत दळवी याच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले. अर्णवचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला असावा, असा अंदाज लावला जात असतानाच त्याच्या कुटुंबीयांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे म्हाते खुर्द ग्रामस्थांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला असला तरी अर्णवचा मृत्यू मग कोणत्या कारणाने झाला, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे.
 
कोरोनाच्या संसर्गाने अनेक मुंबईकर आपल्या मूळ गावी परतले. त्याचप्रमाणे मुंबईहून जयवंत दळवी हे पत्नी व दोन मुलांसह म्हाते खुर्द या गावी परतले. त्यानंतर रविवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने केलेल्या तपासणीत त्यांचा लहान मुलगा अर्णव याचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली. हा मृतदेह तब्बल तीन दिवस लपवून ठेवल्याचेही पुढे आले. त्यानंतर अर्णवचा मृत्यू नेमका कशाने झाला, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे जावळीचे तहसीलदार शरद पाटील यांनी अर्णवच्या घरातील तिघांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठवत त्यांना रायगाव येथील विलगीकरण कक्षात भरती केले होते. मात्र, त्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे म्हाते खुर्द ग्रामस्थांनी नि:श्वास टाकला. दरम्यान, आता अर्णवच्या मृत्यू तपासाला मात्र गती येणार आहे.
 
अर्णवचे आई, वडील व मोठा भाऊ यांना विलगीकरण कक्षातून सोडल्यानंतर मेढा पोलिस आता अधिक चौकशी करणार आहेत. त्यातूनच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांपासून माहिती लपवली व मृत्यूबाबत कोणालाच माहिती न दिल्यावरून अर्णवचे वडील जयवंत दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी दिली.
 

aschim-maharashtra/satara-governor-bhagat-singh-koshyari-may-visit-karad-294938" target="_blank">राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारींना कऱ्हाडला येण्याच्या आमंत्रणाचा निर्णय

विहिरीच्या दुरुस्तीतून दाखवली 'पाटील'की

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई; 50 हजारांचा दंड वसूल

सरपंच म्हणतात मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Arnavs Parents Covid19 Tested Negative