कऱ्हाड ः शिरखुर्मासाठी लागणारी ड्रायफ्रुटची उलाढाल ठप्प

सचिन शिंदे
शुक्रवार, 22 मे 2020

सध्या ड्रायफ्रुटचा ज्याकडे माल आहे, तो चढ्या दराने विकतो आहे. पराज्यातून माल मागवायचा म्हटले, तरी राज्य बंदी असल्याने तेही शक्‍य होण्यासारखे नाही. त्यामुळे सारीच उलाढाल लॉकडाउन झाली आहे. त्याचा मोठा फटका बसतो आहे. 

कऱ्हाड ः रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर ड्रायफ्रूटला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, यंदाची ड्रायफ्रूटची अख्खी उलाढाल कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाउनच्या विळख्याने ठप्प झाली आहे. पुणे, मुंबईचा बाजारपेठेतून जिल्ह्यात ड्रायफ्रूटची आवक होते. मात्र, यंदा त्या भागात कोरोनामुळे एक टनही मालाची आवक होणार नाही. त्यामुळे यंदाची रमाजानची इद विना ड्रायफ्रूटचीच करावी लागणार आहे. जिल्ह्यात कोट्यवधीच्या उलाढालीला यामुळे "ब्रेक' लागला आहे. बाजारात विक्रीला ड्रायफ्रूटच नसल्याने शिल्लक असलेल्या ड्रायफ्रूटच्या मालावरच घाऊक व्यापाऱ्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांसह नागरिकही हैराण आहेत.
 
मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाचा रमाजन महिना सुरू आहे. या महिन्यात रोजा सोडताना गोड पदार्थ म्हणून खजूर अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, लॉकडाउनमुळे बाजारातील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे खजूर मिळेना, अशी स्थिती झाली आहे. ज्यांच्याकडे खजूर शिल्लक आहेत, त्यांनी तो चढ्या दराने विकण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे तोही शिल्लक खजूर आता संपला आहे. त्यामुळे यंदाचा रमजानच्या प्रत्येक रोजा खजुराविना सोडावा लागत आहे. त्यासारखीच अवस्था सगळ्याच ड्रायफ्रूटची झाली आहे. खजुराप्रमाणेच बाजारात काजू, चोरोळे, बदाम, पिस्ता, अंजीर, वेलची, आक्रोड, खारिक, खोबरे यासारख्या ड्रायफ्रूटची अवस्था बिकट झाली आहे. बाजारात शिल्लक असलेला ड्रायफ्रूट व्यतिरिक्त बाहेरून मालच आलेला नसल्याने त्याचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. अत्यंत महाग जिन्नस विक्रीस नसल्याने व्यापारीही हवालदिल झाले आहेत. ड्रायफ्रूटचा सगळा माल पुणे, मुंबईहून येतो. मात्र, यंदाचा त्याच मार्केटला टाळा लागल्याने जिल्ह्यात ड्रायफ्रूटचा मोठा तुटवडा जाणवतो आहे.
 
जिल्ह्यात ड्रायफ्रूट विकणारी 500 च्या आसपास दुकाने आहेत. मात्र, एकाही दुकानदाराकडे त्याचा अतिरिक्त साठा नाही. दर वर्षी रमजान ईदच्या अगोदर आठवडाभर त्याचा बाजार फुलतो. मात्र, यंदा त्याची शाश्वती राहिलेली नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्केट खुले होईल, याची शाश्वती राहिलेली नाही. मार्केट खुले झाले, तरी मुंबई- पुण्याहून येणारा सरासरी सगळा माल तेथेच लॉकडाउन झाला आहे. त्यामुळे त्याची शाश्वतीच राहिलेला नाही. एका घाऊक व्यापाऱ्याचे किमान कोटभर रुपयांची उलाढाल गृहीत धरल्यास त्या बाजारपेठेच्या नुकसानीचा आकडा कोट्यवधीच्या उड्डाणे घेतो. त्यामुळे ती हानी न भरून येणारी आहे. सध्या ज्याकडे माल आहे, तो चढ्या दराने विकतो आहे. पराज्यातून माल मागवायचा म्हटले, तरी राज्य बंदी असल्याने तेही शक्‍य होण्यासारखे नाही. त्यामुळे सारीच उलाढाल लॉकडाउन झाली आहे. त्याचा मोठा फटका बसतो आहे. 

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

याबाबत ड्रायफ्रूटचे व्यापारी म्हणाले कोरोनासारख्या आजारामुळे मुंबई, पुणे येथील बाजारपेठ ठप्प आहे. मुख्य बाजारपेठाच ठप्प असल्याने जिल्ह्यात ड्रायफ्रूटचा मालच आलेला नाही. परिणामी यंदाच्या ईदला विकल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रूटच्या जिल्ह्यातील बाजारपेठेची उलाढाल ठप्प होणार आहे. ज्यांच्याकडे माल शिल्लक आहे. त्यानाही लॉकडाउनमुळे दुकान उघडून तो देता येणार नाही. त्यामुळे मोठी कठीण स्थिती आहे. त्याचा उलाढालीवरही परिणाम होतो आहे.

गावाकडंची माती... 

सातारा शहरातील मुख्य बाजारपेठ खूली हाेण्याचा मार्ग माेकळा 

काेराेना राक्षसाला नमवून ते शंभरजण परतले

मुंबईकर आमच्या जिवा भावाचाच पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Dry Fruit Shopkeepers Says Lack Of Stock