दहिवडीत गावठी मिळेना अन् बॉयलरचा वधारला भाव

दहिवडीत गावठी मिळेना अन् बॉयलरचा वधारला भाव
Updated on

दहिवडी : चिकनमुळे कोरोना होतो, या अफवेमुळे मार्च-एप्रिलमध्ये पोल्ट्री व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. मात्र, मे महिन्यात कुणी कोंबडी देता का कोंबडी, असे म्हणायची वेळ चिकनप्रेमींवर आली आहे. मागणी जास्त व पुरवठा नगण्य यामुळे गावठी कोंबड्या पाचशे रुपयाला एक, तर बॉयलर चिकन तब्बल अडीचशे रुपये किलोने विकले जात आहे.
 
चिकनमुळे उठलेल्या अफवेमुळे मार्च महिन्यात चिकन व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली. चिकन विक्री ठप्प झाली. दोन ते तीन किलोच्या कोंबड्या फक्त पन्नास रुपयांना विकण्यात आल्या. यामुळे पोल्ट्री व चिकन व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. चिकनमुळे कोरोना होत नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे हळूहळू चिकनचा भाव वाढू लागला. बाजारात माल कमी पडू लागल्याने 50 रुपयांपासून वाढत चाललेला दर आज किलोला अडीचशे रुपयांपर्यंत पोचला आहे. काही दिवसात या दरानेही चिकन मिळणे अवघड होणार आहे. पोल्ट्री व्यवसायाशी निगडित कारखाने बंद आहेत. त्यातच नवीन पिल्ले सुध्दा उपलब्ध नाहीत. त्यामुळे आगामी काळात काही दिवस चिकनशिवाय काढावे लागणार आहेत.
 
चारकमानी मंडळी मोठ्या प्रमाणात गावी आल्यामुळे रंगीत-संगीत पार्ट्यांचे प्रमाण वाढले आहे. यात्रा-जत्रा बंद असल्यामुळे मांसाहारप्रेमी मिळेल त्या भावाने गावठी कोंबड्या घेत आहेत. मात्र, आता हातात पैसा असूनही गावठी कोंबडी मिळेना तर बॉयलर चिकनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या बॉयलर चिकन सध्या चांगलाच भाव खात आहे. 


सध्या चिकनला जास्त मागणी आहे तसेच सध्या मालाचा तुटवडा आहे. त्यामुळे चिकनचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आगामी काळात विक्रीसाठी चिकन उपलब्ध होणे अवघड होणार आहे. 
- इम्रान मुलाणी, चिकन व्यावसायिक, मलवडी


पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं 

कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Political News
Sangli Municipal Corporation Recruitment
Krishna River Crocodile Sighting
Karnataka Sugar Season Date Yet to Be Announced
Marathi News Esakal
www.esakal.com