सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी
Updated on

सातारा : मुंबईकडून येणाऱ्या नागरिकांची कोरोनाबाधित होण्याची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे. या नागरिकांमुळे जिल्ह्यातील अन्य नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी मुंबई व परिसरातून जिल्ह्यात येण्याची इच्छा असलेल्यांना परवानगी देऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित भागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना अत्यावश्‍यक कारण वगळता "नो एन्ट्री' राहणार आहे.
पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं  

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आहे, तेथेच थांबणे भाग पडले. जिल्हा व तालुक्‍यांतर्गत प्रवासालाही बंदी होती. पहिल्या दोन लॉकडाउनमध्ये अत्यावश्‍यक कारण वगळता नागरिकांना घराबाहेरच पडण्यास बंदी होती. तरीही सुरवातीच्या काळात मुंबईवरून अनेक लोक जिल्ह्यातील आपल्या गावी दाखल झाले होते. परंतु, पहिल्या आठवड्यानंतर बाहेरून येणाऱ्यांभोवतीचा फास आणखी कडक झाला. विनापरवानगी येणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे नागरिकांचे बाहेरून येणे बंद झाले. 
 
तिसऱ्या लॉकडाउनमध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासाला काही नियम व अटींवर परवानगी देण्यात आली. तसेच जिल्हा तसेच राज्याबाहेर नागरिकांना पाठविण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले. कोरोनाची लक्षणे नसल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्रासह अर्ज केल्यानंतर संबंधितांना आपल्या इच्छित ठिकाणी जाण्यासाठी परवानगी देण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्यांनाही तशी परवानगी देण्यात आली आहे. त्यातून अनेकजण परजिल्ह्यात तसेच परराज्यामध्ये गेले आहेत.
 
इतर राज्ये तसेच जिल्ह्यांतून आपल्या जिल्ह्यात येण्यासही अनेक इच्छुक आहेत. त्यांनी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबईहून एक लाखापेक्षा जास्त लोक जिल्ह्यात येण्यास इच्छुक असल्याचे समोर येत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामध्ये मुंबईहून आलेल्या प्रवशांचे प्रमाण जास्त आहे. त्यांच्यामुळे जवळच्या सहवासीतांनाही बाधा झाल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्येही रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबईकरांना जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याबाबत परवानगी देऊ नये, असे पत्र तेथील आयुक्तालयांना दिले आहे. 


अत्यावश्‍यक असणाऱ्यांना सूट 

केवळ अत्यावश्‍यक कारण असलेल्यांना जिल्ह्यात प्रवेशाबाबत परवानगी देण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्यांची वाट बिकट झाली आहे. 

साहेबांच्या देहबोलीतूनच महाराष्ट्र झालाय खंबीर

पाटण तालुक्यातील एकाचा मृत्यू; कोविडच्या मार्गदर्शक सुचनानुसार झाले अत्यंसंस्कार

लाॅकडाऊन : धीर धरा आणि आशा कधीच सोडू नका !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com