esakal | Coronavirus : प्रतिक्षा संपली; सातारकरांसाठी गुड न्यूज
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : प्रतिक्षा संपली;  सातारकरांसाठी गुड न्यूज

कोरोना सदृष्य आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील एका आरोग्य सेवकालाही उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

Coronavirus : प्रतिक्षा संपली; सातारकरांसाठी गुड न्यूज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्हा रुग्णालयात शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या कोरोना संशयीतांच्या घशातील स्त्रावाचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात यापूर्वी दाखल झालेल्या नऊ पैकी नऊ जणांना कोरोनाची बाधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
बहामा, दक्षिण अमेरिका व्हाया सातारा येथे आलेला एक 27 वर्षीय युवक व काही वेळ त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र वय 24 वर्षे या दोघांनाही सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे शनिवारी रात्री अकराला त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. तसेच कतार येथून प्रवास करुन आलेला 24 वर्षीय युवकही पहाटे एकच्या सुमारास विलगीकरण कक्षात दाखल केले होते. त्यापूर्वी चिली येथून आलेल्या एका 24 वर्षीय युवकास व दुबई येथून आलेल्या 29 वर्षीय युवकास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
 
या सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील रासायनिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्याचे अहवाल आज (रविवारी) दुपारी जिल्हा रुग्णालयाल मिळाले. रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या पाचही जणांच्या तपासणीचे अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

दरम्यान आत्तापर्यंत जिल्हा रुग्णालयात एकुण नऊ जणांना संशयावरून दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्णा बाधीत रुग्ण आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना सदृष्य आजाराची लक्षणे दिसत असल्यामुळे जिल्हा रुग्णालयातील एका आरोग्य सेवकालाही उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. 

आपलं घर भरलेलं असावं पोरी..वेळ काही सांगून येत नाही...

Cornonovirus : प्रत्येक सातारा जिल्हावासियांसाठी बातमी

Coronavirus : कऱ्हाड, फलटण, सातारा, लाेणंदमधील 13 जणांवर गुन्हा दाखल 

असे चालणार सातारा जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांचे व्यवहार