वृत्तपत्र वितरण बंदीचा पुनर्विचार करा : पृथ्वीराज चव्हाण

वृत्तपत्र वितरण बंदीचा पुनर्विचार करा : पृथ्वीराज चव्हाण
Updated on

कऱ्हाड ः वृत्तपत्राला स्पर्श केल्यावर कोरोना होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे वृत्तपत्र मालक, प्रकाशक व पत्रकारांनी वृत्तपत्रांचे घरपोच वितरण सुरू करण्याबाबत केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो. राज्य शासनाने वृत्तपत्र वितरण बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, , अशी भूमिका आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. 
 
ते म्हणाले, ""शासनाने वृत्तपत्राच्या वितरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. तो दुर्भाग्यपूर्ण आहे. याचा पुनर्विचार व्हावा. वृत्तपत्र लोकांच्या घरी पोचणे हा अत्यावश्‍यक सेवेचाच भाग आहे. आज कोरोनाशी लढायचे आहे, ते माहितीच्या आधारावरच. ती माहिती केवळ टीव्ही चॅनेलवरून मिळेल अशी व्यवस्था करणे योग्य नाही. सगळ्यांच्या घरी टीव्ही असेल असे नाही. राज्य शासनाची इच्छा अशी दिसते, की वृत्तपत्र छापावीत ती फक्त स्टॉलवर ठेवावीत. तेथून लोकांनी येऊन विकत घेऊन जावीत. ते व्यावहारिक नाही. मग प्रत्येकाला त्याच्या खरेदीला बाहेर पडावे लागेल.

ज्याप्रमाणे मंडईत भाजी खरेदीला जातो. त्याप्रमाणे वृत्तपत्र घेण्यासाठी फिरावे लागेल. प्रवास करावा लागेल. हे काही योग्य नाही. एक एप्रिलला वृत्तपत्रांचे वितरण सुरू झाले. 18 एप्रिलपर्यंत ते चांगले चालले. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो, असे काही होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.'' 

 

कोरोनाशी लढा देताना माहितीचा आधार महत्त्वाचा आहे. ती माहिती पोचविण्याचे काम वृत्तपत्र करतात. फक्त टीव्ही चॅनेल्सद्वारे माहिती पोचविता येते असे नाही. त्यामुळे वृत्तपत्र वितरणाला परवानगी देण्याची गरज आहे. तसेच एक एप्रिलला वृत्तपत्रांचे वितरण सुरू झाले. 18 एप्रिलपर्यंत ते चांगले चालले. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरतो, असे काही होत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री. 


ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 

वृत्तपत्र वितरणावर बंदीचा राज्याचा तुघलकी आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eknath Shinde Stays Disqualification Order
Koyna Dam discharge latest update
Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Marathi News Esakal
www.esakal.com