सातारा जिल्‍हा बँकेतही "महाविकास'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 January 2020

बाजार समित्या भक्‍कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील.

सातारा : मार्चअखेरपर्यंत जिल्ह्यास मिळालेला निधी खर्च करण्यासाठी आढावा घेतला असून, कोणत्याही परिस्थितीत निधी मागे जाऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही वित्त व गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. राज्यात महाविकास आघाडी असून, ती खाली यावी, असे विधान सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या प्रश्‍नावर त्यांनी केले. 

 

हे वाचा : पोलिस भरतीसंदर्भात मोठा निर्णय; आता मैदानी चाचणीनंतर लगेच...

मंत्री देसाई यांनी वित्त, राज्य उत्पादन शुल्क, पणन, कौशल्य विकास आदी विभागांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ""मार्च महिन्यास दोन महिने राहिले असून, अखर्चित निधी खर्च होण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दोन- तीन विभागांचा अपवाद वगळता इतर विभागांचा निधी मार्गी लागला आहे. आगामी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात निधी वाढवून मिळविण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.'' 

हेही वाचा : आरर...महसूल, पाेलिसांचा असाही विक्रम

जिल्हा बॅंकेचे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबाबत शिवसेनेची भूमिका काय असणार या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. ते खाली यावे, हे माझे मत आहे. वरिष्ठांची चर्चा करून ते जसे आदेश देतील, तसे काम करणार आहे. बाजार समित्या भक्‍कम करण्यासाठी, त्यांना आर्थिक सुबकता देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि मी प्रयत्न करणार आहे. बाजार समित्यांत काय अडचणी आहेत, त्याची कारणे काय हे अभ्यासून त्यात सुधारणार केल्या जातील.'' 

आणखी वाचा : या ठिकाणी महाविकास आघाडीचा नवीन फॉर्म्युला...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यास गेलो. तेव्हा त्यांनी कौशल्य विकासवर विशेष भर देण्यास सांगितले. आयटीआयचे पारंपरिक कोर्स बदलून कंपन्यांना आवश्‍यक ते अभ्यासक्रम सुरू करण्यास सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सकाळीच माझी भेट घेतली. त्यांच्याबरोबर कौशल्य विकास वाढीसाठी प्रयत्न करता येतील का, यावर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे श्री. देसाईंनी सांगितले. 

आवश्‍‍य वाचा : सेना मंत्री अन्‌ एसपींचं जमलं

मल्हारपेठ येथे पोलिस ठाणे व्हावे, यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न करत आहे. मी मंत्री झाल्याने आता जिल्ह्यातील दहाही, तसेच राज्यातील प्रस्तावित पोलिस ठाणी मंजूर करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करणार आहे. मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन तसा शासन निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार असून, जिल्ह्यास चांगला वाटा मिळवू, अशी ग्वाही मंत्री देसाईंनी दिली. 

शंभूराज म्हणाले... 
मेडिकल कॉलेजला प्राधान्य देणार 
शिवसेना बळकटीची जबाबदारी माझ्यावर 
पाटणमधील ओढ्यांवरील अतिक्रमणे हटविणार 
माजी मंत्री विजय शिवतारेंनी चांगले काम केले 
विक्रमसिंह पाटणकरांनी शुभेच्छा दिल्या नाहीत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Co-operative Bank Should Come To The Mahavikas Aadhaghi Power Satara News