कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार; "सकाळ रिलीफ फंडा' ला दिली मदत

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार; "सकाळ रिलीफ फंडा' ला दिली मदत

वाई : कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी वाईतील 81 वर्षांच्या मधुकर बाबूराव भोसले या माजी सैनिकाने आपले एक महिन्याचे निवृत्तीवेतन "सकाळ रिलीफ फंड'साठी आर्थिक मदतीच्या स्वरूपात आज दिले. यानिमित्ताने आपल्या माजी सैनिक बांधवांना, तसेच समाजातील इतरांना प्रेरणा मिळावी एवढीच आपली इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
 
संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आपल्या देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करीत आहे. कोरोनाचा प्रसार हे देशासमोरचे मोठे संकट आहे. अशा संकटसमयी सर्वच लोकांनी मदतीचा हात पुढे करणे आवश्‍यक आहे. संकटाच्या काळात सकाळ रिलीफ फंड नेहमीच पुढाकार घेत आला आहे. या वेळीही अत्यावश्‍यक वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तू पुरविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाने सकाळ रिलीफ फंडासाठी मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार वाईतील मधुकर भोसले या माजी सैनिकाने आपल्या एक महिन्याच्या निवृत्तीवेतनाचे 28 हजार 130 रुपये सकाळ रिलीफ फंडासाठी दिले. "सकाळ'चे वाई येथील प्रतिनिधी भद्रेश भाटे यांच्याकडे त्यांनी ही रक्कम सुपूर्द केली. 

यासंदर्भात श्री. भोसले म्हणाले, ""मी "सकाळ'चा नियमित वाचक आहे. वृत्तपत्र आणि टीव्हीवर कोरोना विषाणूच्या बातम्या पाहिल्यानंतर संपूर्ण देशावर कोरोनाचे मोठे संकट आले असल्याचे लक्षात आले. या संकटाला लढा देण्यासाठी देशाचा एक नागरिक म्हणून आपणही काहीतरी पुढाकार घेतला पाहिजे, यासाठी पत्नी सुमन हिच्याशी चर्चा केली. त्या वेळी सकाळ रिलीफ फंडाने वृत्तपत्रातून केलेले आवाहन वाचनात आले. त्यानुसार आम्ही दोघांनी एक महिन्याची पेन्शन सकाळ रिलीफ फंडाला देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांनीही आमच्या या निर्णयाचे स्वागत केले.'' 
श्री. भोसले हे आयआयटीचे शिक्षण घेतल्यानंतर 1963 मध्ये इलेक्‍ट्रिक व मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून सैन्य दलात भरती झाले. नोकरीच्या निमित्ताने ते संपूर्ण देशात फिरले असून, 23 वर्षांनंतर ते निवृत्त झाले. त्यांचा थोरला मुलगा शैलेंद्र अहमदाबाद येथे कोलगेट कंपनीत केमिकल इंजिनिअर असून, धाकटा मुलगा शशिकांत मुंबईत इलेक्‍ट्रिक कॉन्ट्रॅक्‍टर आहे. विवाहित मुलगी शर्मिला घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास आहे. 

पाेरांच्या करामतींमुळे गावागावांत थरथराट चित्रपटाच्या आठवणींना मिळू लागला उजाऴा

Video : कॉंग्रेसमध्ये एक तरी दिवा दाखवा की ज्याने सांगितल्यावर लोक घरातील दिवे लावतील; पृथ्वीराज चव्हाणांना आव्हान

ग्राहकांच्या साेयीसाठी आणि महावितरणला मदत हाेईल अशा प्रकारे एकमेकांना साह्य करण्याची आत्ताच वेळ आहे. सविस्तर जाणून घ्या 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com