पोलिस ठाण्यातच फिल्मी स्टाइल मारामारी; महिला पोलिसालाही ढकलून दिले

पोलिस ठाण्यातच फिल्मी स्टाइल मारामारी; महिला पोलिसालाही ढकलून दिले
Updated on

कोरेगाव : मारामारीमध्ये जखमी झालेला एका बाजूचा एक आणि दुसऱ्या बाजूचे पाच जण एकाच वेळी पोलिस ठाण्यात आले. "तक्रार का देतोस,' असे म्हणत पाचपैकी तिघांनी समोरच्या एकाला पुन्हा मारहाण करून "त्याची तक्रार घ्यायची नाही,' असे म्हणत ठाणे अंमलदार असलेल्या महिला पोलिसाच्या हातातील पेन व कागद हिसकावून घेऊन ढकलून दिले. भांडण सोडवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला आलेल्या दोन होमगार्ड कर्मचाऱ्यांना दोघा संशयितांनी पोलिस ठाण्याच्या आवारातील विटांनी मारहाणही केली. याप्रकरणी जळगाव नाका (कोरेगाव) येथील तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद दिलीप फडतरे, रोहित लालासाहेब फडतरे, जीवन हणमंत फडतरे (सर्व रा. जळगाव नाका, कोरेगाव) अशी या प्रकरणातील संशयितांची नावे आहेत.
 
यासंदर्भात पोलिस नाईक पूनम मधुकर वाघ (रा. पोलिस वसाहत, कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की काल (ता. 12) मी ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर हजर असताना, सायंकाळी पावणेसातच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर "जळगाव नाका येथे भांडणे झाली आहेत,' असा फोन आला; परंतु अधिक माहिती विचारेपर्यंत फोन कट झाला. प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन मी राखीव ठाणे अंमलदार हवालदार के. एम. फरांदे, तसेच आझाद चौक येथे ट्राफिक ड्युटीवर असलेले हवालदार खुडे व गाढवे यांना फोन करून तत्काळ जळगाव नाका येथे जाण्यास सांगितले. दरम्यान, पोलिस ठाण्याबाहेर कृष्णत हणमंत फडतरे, आकाश राजू फडतरे, जीवन हणमंत फडतरे, असे तीन जखमी व त्यांच्यासोबत प्रसाद दिलीप फडतरे, रोहित लालासाहेब फडतरे (सर्व रा. जळगाव नाका, कोरेगाव) हे पाच जण आले.

त्याच वेळी सोमनाथ गणपत भोसले हा आणखी एक जखमी आला व त्याने आधी आलेल्या जीवन फडतरे व इतरांकडे निर्देश करून या सर्वांनी मला मारल्याचे सांगितले. या वेळी सोमनाथला मेडिकल यादी देण्यासाठी त्याच्याकडून माहिती घेत असतानाच प्रसाद, रोहित व जीवन यांनी आमच्याविरुद्ध तक्रार का देतोस, असे म्हणत सोमनाथला मारहाण सुरू केली. दरम्यान, मी आणि होमगार्ड टी. बी. पवार, आर. एस. शिंदे व स्टाफने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या वेळी प्रसाद फडतरे याने माझ्या हातातील पेन व कागद हिसकावून घेऊन मला ढकलून दिले, तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला, तर रोहित व जीवन यांनी आवारातील विटांनी होमगार्ड पवार व शिंदे यांना मारून दुखापत पोचवली आणि आम्हा सर्वांना शिवीगाळ, दमदाटी केली. या मारहाणीत होमगार्ड शिंदे यांचा शासकीय गणवेश फाटला आहे.

या वेळी मी व पोलिस ठाण्यातील उपस्थित स्टाफ संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पुढे आलो असता, प्रसाद व रोहित हे दोघे जण पोलिस ठाण्याबाहेर पळत गेले व आवाराबाहेरील पांढऱ्या रंगाच्या ऍक्‍टिव्हा दुचाकीवरून (क्रमांक दिसला नाही) पळून गेले. मंगळवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक सुनील गोडसे तपास करत आहेत.

अरे वाऽऽऽ आता बिनधास्तपणे न्याहाळा 'ते' सौंदर्य

Video : पन्नास दिस झालं बघा चिमुरड्यांची भेटच नाही 

अभिमानास्पद : देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांत कृष्णाची निवड; कोरोनावरील लस सामन्यांना उपलब्ध हाेणार

Video : इमर्जन्सी पेशंट...धावाधाव...त्यात डाॅक्टरांची अट...घाबरगुंडी...पुढे काय घडले वाचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com