सातारा जिल्ह्यात आजही वाढले कोरोनाचे रुग्ण

सातारा जिल्ह्यात आजही वाढले कोरोनाचे रुग्ण
Updated on

सातारा : वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून दाखल करण्यात आलेल्या 2 नागरिकांचा अहवाल कोरोना (कोविड 19) बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 68 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 79 बाधित रुग्ण आढळले आहेत.

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 5, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 152, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 9 असे एकूण 171 जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.  

दरम्यान रविवारी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 29 (आरोग्य कर्मचारी-3, कोरोनाबाधितांचे निकट सहवासित-14, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-3,  कोरोना बाधित परिसरातील गरोदर माता-6), कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 4 (श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे-4),  वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 25 (आरोग्य कर्मचारी-7 कोरोना बाधित रुग्णाचे निकट सहवासित-16, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतू संसर्गाचे 1, गरोदर माता-1,) अशा एकूण 58 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले  हाेते.

या 58 नागरिकांबरोबर कोरोना बाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे नमुने-4, आरोग्य कर्मचारी आठ दिवसांनंतरचे नमुने-2 अशा 64 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

...म्हणून त्यांच्यासह सर्वांवर आलेली हीच ती वाईट वेळ; सातारा जिल्हावासियांची भावना

कोरोनाबाधीतेची रुग्णालयात हेळसांड; नातेवाईकांचा उद्रेक

एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur contractor bribery allegations
Mahayuti Under Strain? Satara-Sangli Election Turns Into a Political Test
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com