पुण्यातील डॉक्टर दांपत्य अपघातात ठार

पुण्यातील डॉक्टर दांपत्य अपघातात ठार
Updated on

उंब्रज (जि. सातारा) : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मुलांना चंदगड येथून आणण्यासाठी निघालेल्या पुण्यातील डॉक्टर दांपत्यचा पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी (ता.कऱ्हाड) गावाच्या हद्दीत मोटार अपघातात जागीच ठार झाले. 

महामार्गावरुन भरधाव निघालेल्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून ती दुभाजकाला धडकून पहाटे चारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. डॉ. अमित आप्पाजी गावडे (वय ३८), डॉ. अनुजा अमित गावडे (वय ३५, दोघेही रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, हडपसर, पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे.

पोलीस व घटनास्थळावरील माहिती अशी, पुणे- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कऱ्हाड मार्गिकेवर कोल्हापूरकडे मोटार (एमएच १२ जेयू ८८९२) भरधाव वेगात जात होती. पहाटे चारच्या सुमारास येथून जवळच असलेल्या भोसलेवाडीनजीक मोटारीवरील चालकाचा ताबा सुटून मोटार महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. त्यात ती पलटी होवून सातारकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गेली. 

अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला आहे. या मोटारमधील डॉ. अमित गावडे व डॉ. अनुजा गावडे गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी डाॅक्टर दांपत्य जात होते. अपघाताची माहिती समजताच येथील पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केले.


अजित पवार,जयंत पाटलांनी करुन दाखवलं; यांच्या गाेलगप्पाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com