सातारा : वाईन शॉप उघडणार; टाेकन सिस्टीमने मिळणार दारु

सातारा : वाईन शॉप उघडणार; टाेकन सिस्टीमने मिळणार दारु
Updated on

सातारा : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पा संपण्यास पाच दिवसांचा अवधी राहिला असतानाच सातारा जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून मद्य विक्रीला अखेर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत मद्य विक्रीची दुकाने सुरू राहतील विक्रेत्यांनी आणि ग्राहकांनी साेशल डिस्टंटस पाळावे अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे प्रशासनाने आज (मंगळवारी) दुपारी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अ.बा.चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्य विक्रीच्या दुकानांचे व्यवहार सुरु करण्याबाबत अटी- शर्तींसह परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन वगळून किरकोळ मद्य विक्रीचे व्यवहार सुरू राहतील.

दरम्यान कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 24 मार्च रोजी देशभर लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर तब्बल 50 दिवसांनतर उद्या (बुधवार) सातारा जिल्ह्यात दारु विक्रीची दुकाने सुरु हाेणार आहेत. जिल्ह्यातील दारु विक्रेत्यांनी ग्राहकांचा गोंधळ उडू नये यासाठी दुकानाच्या बाहेर बॅरीकेटस लावण्यास प्रारंभ केला आहे. 


विक्रेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना 

  • दुकान आणि सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
  • सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत दुकान सुरु ठेवावे.
  • सर्व कामगारांची आणि ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करावी. 
  • ज्या नोकरास, ग्राहकास सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे आहेत, त्यास प्रवेश देऊ नये.
  • फक्त सीलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. 
  • कोणत्याही परिस्थितीत मद्य विक्रीच्या दुकानांमध्ये मद्यप्राशन होणार नाही यांची दक्षता घ्यावी. 
  • मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्यास कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई  
  • मद्यविक्री दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात फलक सूचनांचा फलक लावण्यात यावा.
  • लॉकडाऊनबाबत मार्गदर्शक तत्वे पाळणे बंधनकारक
  • मद्यविक्रीच्या दुकानांसमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत. 25 ग्राहकांसाठी टाेकन सिस्टीम राबवून मद्याची विक्री करावी. 
  • दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटअंतर असणे अनिवार्य 
  • दुकानांसमोर प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखून घ्यावीत.
  • दुकानात येणाऱ्या ग्राहकांसाठी सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी विक्रेत्याची राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com