esakal | ब्रेकींग : साताराकरांनो दाेन दिवस पाणी येणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकींग : साताराकरांनो दाेन दिवस पाणी येणार नाही

तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे. याबाबतचे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.

ब्रेकींग : साताराकरांनो दाेन दिवस पाणी येणार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा नगरपरिषदेच्या ज्या भागातील नागरिकांना शहापूर योजना (उरमोडी नदी उद्भव) या योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. त्या सर्व नागरिकांना कळविणेत येते आज (मंगळवार १८/०२/२०२०) शहापूर पंप हाऊस येथे देखभाल दुरुस्तीचे काम करणे गरजेचे हाेते. हे काम सातारा नगरपरिषदेने तातडीने हाती घेतलेले आहे. या कामास १९ ते २० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शहापूर माध्यमातील हाेणारा पाणीपूरवठा हाेऊ शकणार नाही. 

सातारा नगरपरिषदेच्या पाणी पूरवठा विभागाने कळविल्यानूसार उद्या (बुधवार ता. १९ ) शहापूर माध्यमातील सकाळ सत्रातील गुरुवार टाकी व घोरपडे टाकी या टाक्यांना पाणीपुरवठा होणार नाही. तसेच गुरुवार (ता. २०) रोजी शहापूर माध्यमातील सकाळ सत्रातील यशवंत गार्डन टाकी, गणेश टाकी या टाक्यांना पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी या टाक्यांच्या माध्यमातून शहारात हाेणारा पाणी पूरवठा हाेऊ शकणार नाही. उर्वरित सर्व भागातील नागरिकांना पाणीपुरवठा नेहमीच्या वेळेत होईल. तेथील पाणीपुरवठ्याच्या वेळेमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरी शहरातील शहापूर माध्यमातील सर्व नागरिकांना कळविणेत येते की, उपलब्ध पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करुन नगरपरिषदेस सहकार्य करावे. याबाबतचे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे, पाणी पुरवठा सभापती यशोधन नारकर, पालिकेचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केले आहे.

वाचा : मावळ्यांच्या गर्जनेने दुमदुमणार किल्ले प्रतापगड

हेही वाचा : चर्चा तर हाेणारच...सातारा पालिकेची चर्चाच चर्चाच


अतिक्रमणविरोधी मोहीम थांबविण्यासाठी हॉकर्स संघटना सरसावली

सातारा : पालिकने सुरू केलेली अतिक्रमणविरोधी मोहीम थांबविण्याच्या मागणीसाठी आज (मंगळवार) हॉकर्स संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. 
कालपासून पालिकेने शहरातील अतिक्रमणांवर कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. काल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली. ही मोहीम पुढील दहा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉकर्स संघटनेच्या वतीने रास्ता रोको करून फेरीवाला धोरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रतीचे दहन करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानुसार आज सकाळी शहरातील हॉकर्स डी. बी. कदम मार्केट यार्डच्या समोरील जागेत जमले होते. परंतु, त्यांनी रास्ता रोको व निर्णयाच्या प्रतीचे दहन करण्याचा निर्णय मागे घेतला. परंतु, पालिकेने सुरू केलेली अतिक्रमण मोहीम तातडीने थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. या वेळी फेरीवाला धोरणाबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल पालिकेचा निषेध करण्यात आला. तसेच अतिक्रमण तातडीने थांबविण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निकम, शहराध्यक्ष संजय पवार यांच्यासह शहरातील विविध ठिकाणचे हॉकर्स विक्रेते सहभागी झालेले होते. 

 

loading image