development
development

सईबाईंच्या समाधीचा लवकरच जिर्णोद्धार

फलटण शहर (जि. सातारा) : स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या महाराणी व छत्रपती संभाजी महाराजांच्या आईसाहेब महाराणी छत्रपती सईबाई महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम किल्ले राजगडाच्या पायथ्याला लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा मिळणार आहे. 


श्रीमंत सईबाईसाहेब समाधी ट्रस्टच्या माध्यमातून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, फलटणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या जीर्णोद्धाराचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून, किल्ले राजगडाच्या पायथ्याला पाल खुर्द गावातील गुंजवणीतील नदी किनारी नयनरम्य स्थळी या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे. महाराणी छत्रपती सईबाई महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराच्या कामात लक्ष घालून रामराजे नाईक- निंबाळकर यांनी देखणा सुंदर असा प्रकल्प अहवाल तयार करून इतिहासाला उजाळा दिल्याबद्दल इतिहासप्रेमींनी आनंद व्यक्त केला जात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथे पर्यटनस्थळ विकसित होऊन इतिहासप्रेमींसह इतर पर्यटकांचीही वर्दळ वाढून परिसरातील सर्व पूरक व्यावसायिकांना व रोजगारालाही चालना मिळेल, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com