Coronavirus वाचा : सातारा जिल्ह्यासाठीची गुड न्यूज

Coronavirus वाचा : सातारा जिल्ह्यासाठीची गुड न्यूज
Updated on

कऱ्हाड : नागपुरवरुन आलेल्या बाबरमाची येथील आणि चरेगाव येथील दोन्ही कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते दोघे आज (साेमवार) कोरोनामुक्त झाले. संबंधित दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या विशेष काळजी घेतली हाेती. त्यांना येथील कृष्णा हॉस्पिटलमधुन घरी सोडण्यात आले. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केल्याने तेही भारावुन गेले.
 

बाबरमाची येथील 32 वर्षीय युवक नागपुरवरुन आला. त्यानंतर त्याला त्रास होवुन लागल्याने त्याला 18 एप्रिलला कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याची कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. त्यानंतर संबंधिताच्या संपर्कातील सहवासीतांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान आज संबंधित युवक 17 दिवसानंतर आज कोरोनामुक्त झाला. त्यापुर्वी त्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर तपासण्यात करण्यात आल्या आहेत. ते त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याने त्याला आज घरी सोडण्यात आले.

 त्याचबरोबर येथील उपजिल्हा रुग्णालयात 17 एप्रिलला चरेगाव येथील एका 30 वर्षीय युवकाला त्रास होवु लागल्याने तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. संबंधिताचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याला काही दिवस उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी 25 एप्रिलला कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या तपासण्या केल्यावर संबंधिताचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. त्यामुळे त्यालाही आज घरी सोडण्यात आले. संबंधित दोघांवर कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर्सनी केलेल्या उपचारामुळे आणि नर्सिंग स्टाफने घेतलेल्या विशेष काळजीमुळे हे दोन्हीही रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, मंडल अधिकारी पी.डी. पाटील यांनी या कोरोनामुक्त तरुणांचे गुच्छ देऊन अभिनंदन केले.

खरंच... तांबवेकर लई भारी! 

सातारा जिल्ह्यात आजही वाढले कोरोनाचे रुग्ण

एका चोरीची अजब चर्चा; पोलिसांसमोरही आव्हान

नोटाबंदी, जीएसटीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा या साठीही हट्टीपणा : पृथ्वीराज चव्हाण

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com