बिदाल : क्षणांत हाेत्याचे नव्हते झाले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

घटनास्थळी माणच्या तहसीलदार बाई माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्यासह कर्मचार्यांनी भेट दिली. घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी नियंत्रीत करताना पोलीस कर्मचार्यांची दमछाक होत होती.

दहिवडी : पाईप लाईनचे काम करण्यासाठी आलेल्या जेसीबीसह तरुण चालक विहिरीत पडल्याने चालकाचा बुडून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही घटना माण तालुक्यातील बिदाल येथे घडली. साधारण सकाळी साडे सातची वेळ. उन्हाळ्यामुळे पाईप लाईनचे काम सुरु करण्यासाठी बिदाल (ता. माण) येथील वैभव भरत मुळीक (वय : २५ वर्षे) हा जेसीबी मशीनसह विनायक जगदाळे यांच्या विहीरीवर आला. श्रीफळ वाढवून कामास सुरुवात करण्यात आली. विनायक जगदाळे हे कुठून कशी पाईप लाईन न्यायची यासाठी फक्की टाकत होते. तर वैभव याने जेसीबीच्या सहाय्याने विहीरीलगतची जागा साफ करण्यास सुरुवात केली. मात्र साफसफाई करत असताना वैभवचे जेसीबी मशीनवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मातीवरुन जेसीबी मशीन घसरुन वैभव मशीनसह थेट विहिरीतील पाण्यात पडला.

काही कळण्याच्या आतच तब्बल पंचवीस पेक्षा जास्त फुट खोली असलेल्या पाण्यात वैभव जेसीबीसह बुडाला. तत्काळ विनायक जगदाळे यांनी या घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर वेगाने हालचाली करुन बचाव कार्यसाठी दोन जेसीबी, एक पोकलेन व एक क्रेनला पाचारण करण्यात आले. त्यानंतर मदतकार्यास सुरुवात करण्यात आली. काही वेळात आणलेल्या मशिनींच्या सहाय्याने बुडालेला जेसीबी बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र महत्प्रयास करुनही वैभवचा शोध लागत नव्हता.

त्यामुळे शेवटी सकाळी दहाच्या सुमारास मोटारीच्या सहाय्याने विहीरीतील पाणी काढण्यास सुरूवात करण्यात आली. एका मोटारीने पाणी निघणे शक्य नसल्याचे लक्षात येताच पाणी काढण्यासाठी एकूण तीन मोटारी लावण्यात आल्या. दुपार उलटून गेली तरी विहरीतील पाणी निघाले नव्हते. तसेच वैभवचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे वैभवचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला

दहिवडीत गावठी मिळेना अन् बॉयलरचा वधारला भाव

घटनास्थळी माणच्या तहसीलदार बाई माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्यासह कर्मचार्यांनी भेट दिली. घटनास्थळी झालेली बघ्यांची गर्दी नियंत्रीत करताना पोलीस कर्मचार्यांची दमछाक होत होती.

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Youth Fall In River With JCB