घरगुती साहित्यातून युवकांनी चक्क साकारला कुलर

घरगुती साहित्यातून युवकांनी चक्क साकारला कुलर
Updated on

तळमावले (जि.सातारा) : लॉकडाउनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळेत येथील महेश ताईगडे व निनाद ताईगडे यांनी नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्नातून घरातील वस्तूंच्या मदतीने कुलर बनवला. कडक उन्हाळ्यात उकाड्याने हैराण होणाऱ्यांसाठी हा कुलर थंडगार हवा देत आहे. या कुलरमुळे उकाड्यात नागरिकांना दिलासा मिळू शकतो. 

लॉकडाउनमुळे सुमारे सव्वा महिन्यापासून घरी थांबून असलेल्या अनेक जण त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देताना दिसतात. महेश व निनाद ताईगडे यांनी घरातील साहित्याचा वापर करून कुलर तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी 35 लिटरचे मोकळे कॅन, छोटी मोटर, पाइप आणि भात्याण असे साहित्य वापरले आहे.

काही प्रमाणात पाइपमध्ये पाणी सोडून घरगुती डिझाइनमध्ये कुलर तयार केला आहे. लोकडाउनमुळे बाहेर पडता येत नसल्याने घरातील साहित्याचा वापर करून काही तरी तयार करावे, या उद्देशाने कुलर बनवण्याची कल्पना आल्याचे ताईगडे यांनी सांगितले. सुमारे एक हजार 600 रुपयात हा घरगुती कुलर तयार झाला आहे. आणखी काही कुलर तयार करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात याचे उत्पादन करून लोकांना ही सेवा उपलब्ध करता येऊ शकते. 


ग्रामीण भागातील युवक कौशल्याच्या जोरावर काहीही करू शकतात. महेश ताईगडे यांनी तयार केलेला कुलर ही त्याचीच प्रचिती आहे. 
- योगेश पाटणकर, युवा उद्योजक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

how heirs apply for PM Kisan after death
Why are Sangli gram panchayat funds stalled?
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Ramdas Athawale receives highway protest memorandum
Marathi News Esakal
www.esakal.com