esakal | सौंदलगा : गणेशमूर्तींच्या किंमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदलगा : गणेशमूर्तींच्या किंमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढ

सौंदलगा : गणेशमूर्तींच्या किंमतीत यंदा २० टक्क्यांनी वाढ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सौंदलगा: श्री गणरायाचे आगमन नऊ दिवसांवर आले असून सौंदलगा (ता. निपाणी) परिसरात श्री गणेशमूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे इंधन दरवाढीने मूर्तीसाठी लागणारा कच्चामाल, रंग आणण्यास वाहतूक खर्च वाढला आहे. सध्या कोरोनामुळे कच्चामाल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या किंमतीत २० टक्के दरवाढ करण्यात आले आहे.

हेही वाचा: इचलकरंजीत पालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

येथील मूर्तिकार विशाल कुंभार, प्रकाश कुंभार, सदानंद कुंभार, विवेक कुंभार, वसंत कुंभार, संजय कुंभार, सुधाकर कुंभार, दत्तात्रय कुंभार, विजय कुंभार, अवधूत कुंभार, आकाश कुंभार, उदय कुंभार, सुशांत कुंभार यांनी सुमारे तीन हजार लहान-मोठ्या मूर्ती तयार केल्या आहेत. काहीजण बाहेरून मूर्ती आणतात. भिवशी, आडी, सिदनाळ, कुर्ली, आप्पाचीवाडी परिसरातील भाविक येथून मूर्ती घेऊन जातात.

"दरवर्षी गणेशमूर्ती तयार करताना कोणतीही अडचण येत नव्हती. पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मूर्तींची उंची कमी झाली आहे. रंग, कच्चामाल तसेच इंधन महागले आहे. त्यामुळे यंदा गणेशमूर्तींचे दर २० टक्क्यांनी वाढले आहेत." -विशाल कुंभार, मूर्तिकार, सौंदलगा

दृष्टिक्षेपात...

सौंदलगा येथील तयार गणेशमूर्ती ३०००

मंडळांच्या गणेशमूर्ती १००

बाहेरगावी जाणारया गणेशमूर्ती १०००

गणेश मूर्तिकार १५

गणेश मूर्तींची मागणी ३ ते ४ फुट

यंदा गणेशमूर्तींची दरवाढ २० टक्के

loading image
go to top