स्मार्टग्रामसाठी या गावाला मिऴाले चाऴीस लाख

avlwadi Fast Rank In Smart Village Sangli Marathi News
avlwadi Fast Rank In Smart Village Sangli Marathi News

 तुंग (सांगली) : 'स्मार्ट ग्राम' स्पर्धेत सावळवाडीने (ता. मिरज) जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत चाळीस लाखांचे पारितोषिक पटकावले. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शासनाची ही स्मार्ट ग्राम योजना आहे. आधी प्रत्येक तालुक्‍यातून एक आणि त्यातून जिल्हा स्तरावर सर्वाधिक गुण मिळवत सावळवाडीने बाजी मारली. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञान या निकषावर ही निवड झाली.

'स्मार्ट ग्राम'साठी हे निकष

वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर सार्वजनिक ठिकाणी शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, बचत गट, प्लास्टीक वापरावर बंदी, घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, पाणी पुरवठा व दिवाबत्तीसाठी वापरलेले वीजबिल नियमित भरणे, मागासवर्गीय महिला व बालकल्याण अंपगावरील खर्च, सौर पथ दिवे, बायोगॅस सयंत्राचा वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतींमध्ये संगणकाचा वापर यासारख्या बाबींची तापसणी करण्यात आली होती. यामध्ये शंभर गुण होते. त्यामध्ये सावळवाडीने सर्वाधिक गुण मिळवित बाजी मारली आहे. 

या गावांना मिऴाले पारितोषिक
तालुकास्तराव येळदरी (जत) कुकटोळी (कवठेमहांकाळ), तडवळे(आटपाडी) सावर्डे (तासगाव), शिरगाव (कडेगाव), रेणावी (खानापूर), रामानंदनगर (पलूस), कुरळप (वाळवा), वाडीभागाई(शिराळा) यांनी प्रथम क्रमांक मिळवताना दहा लाखांचे पारितोषिक पटकावले. 
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com