Bijapur Police : स्कूल बसमधून प्रवास करताना अल्पवयीन मुलीचा विनयभंग; बसचालक कुलकर्णीची निर्दोष मुक्तता

चालकाने अल्पवयीन पीडितेस शेजारील सीटवर बसण्यास सांगून तिचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल, अशी कृती केली.
School Bus
School BusSakal
Updated on
Summary

या प्रकरणी १२ फेब्रुवारीला व्यंकटेश मुतगी याच्याविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

सोलापूर : स्कूल बसमधून (School Bus) प्रवास करताना एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी व्यंकटेश मुतगी ऊर्फ कुलकर्णी याची जिल्हा न्यायाधीशांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

दरम्यान, शहरातील एका नामांकित शाळेत शिकणारी इयत्ता चौथीतील अल्पवयीन मुलगी व तिचा भाऊ हे दोघे संशयित आरोपी व्यंकटेश मुतगी ऊर्फ कुलकर्णी यांच्या मालकीच्या स्कूल बसने शाळेत दररोज ये- जा करत असे.

School Bus
Kolhapur : दीड हजार सापांना जीवनदान देणाऱ्या सर्पमित्राच्या पत्नीचा सर्पदंशाने मृत्यू; हृदयद्रावक घटनेने हळहळ

८ जानेवारी २०१६ रोजी चालकाने अल्पवयीन पीडितेस शेजारील सीटवर बसण्यास सांगून तिचा विनयभंग करून मनास लज्जा वाटेल, अशी कृती केली. या प्रकरणी १२ फेब्रुवारीला व्यंकटेश मुतगी याच्याविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

School Bus
Kolhapur : काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; महाडिकांनी टाकला बॉम्ब, राजकीय वर्तुळात चर्चा

या प्रकरणात अॅड. नीलेश जोशी यांनी सरकारतर्फे तपासलेल्या साक्षीदारांच्या साक्षीत अनेक महत्त्वपूर्ण तफावती व विसंगती असल्याचे, पीडितेच्या कुटुंबात व संशयित आरोपी, यांच्यात वैयक्तिक वाद असून त्याचा बदला घेण्यासाठी खोटी घटना घडल्याचा युक्तिवाद केला.

School Bus
Islampur : अनैतिक संबंधावरून चिडवल्याचा राग मनात धरून पाटोळेचा खून; धारदार शस्त्राने डोक्यात वार

जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शबीर औटी यांनी संशयित आरोपी व्यंकटेश कुलकर्णी याची निर्दोष मुक्तता केली. संशयितातर्फे अॅड. जोशी, अॅड. यशश्री जोशी, अॅड. मल्लिनाथ बिराजदार, अॅड. राणी गाजूल, अॅड. ओकार परदेशी यांनी काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.