शाळकरी मुलीचे अपहरण करून अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

आज सकाळी पीडित मुलीला आरोपीने सुरेगाव येथील कालव्याजवळ सोडून दिले. पीडित मुलगी मोतीनगर येथील नातेवाइकांच्या घरी गेली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

कोपरगाव : तालुक्‍यातील कोळपेवाडी (सुरेगाव) येथील चौथीतील मुलीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर अत्याचार केला. काल रात्री ही घटना घडली. या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे. मात्र, पोलिस व वैद्यकीय यंत्रणा याबाबत मौन बाळगून आहे. पीडित मुलीला उपचारासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेने तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. 

आज सकाळी पीडित मुलीला आरोपीने सुरेगाव येथील कालव्याजवळ सोडून दिले. पीडित मुलगी मोतीनगर येथील नातेवाइकांच्या घरी गेली. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. 

हेही वाचा वाडिया पार्कमधील ते बांधकाम अखेर पाडले 

दरम्यान, मुलगी शाळा सुटल्यावर घरी न आल्याने तिच्या पालकांनी तालुका पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. एक व्यक्ती त्या मुलीस मोटरसायकलवर बसवून घेऊन गेल्याचे दिसत आहे. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांचे एक अशा चार तुकड्या रवाना केल्या. रात्रभर आरोपी व मुलीचा शोध घेऊन सापडले नाही. 

हेही वाचा "तनपुरे' टिकावा ही जिल्हा बॅंकेची इच्छा! 

आरोपीने एक जणाकडून ही गाडी उसाचे वाढे आणण्याचे कारण सांगून नेली होती. आरोपी पाथर्डी येथील ऊसतोड कामगार आहे. याबाबत विचारले असता प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी माहिती देण्यास नकार दिला. सर्वच बाबतीत गुप्तता पाळली जात आहे. 
या घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक डॉ. सागर पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रिया काळे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक अनिल कटके, राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेटी देऊन पंचनामा करून तपासाची सूत्रे हलवली. 

पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज 
पीडित मुलगी ही वेळापूर येथील रहिवासी आहे. कोळपेवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेते. शुक्रवारी (ता. 13) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना आरोपीने तिला खोटी ओळख सांगितली. "मी तुझ्या वडिलांचा भाऊ आहे. तुला घरी नेण्यासाठी मला त्यांनी पाठवले आहे,' असे सांगून गाडीवर बसवले. तिला नेत असतानाचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. शहाजापूर कोळगाव रस्त्याशेजारी असलेल्या कालव्यालगतच्या खोलीत मुलीला नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

 हेही वाचा रुग्णांनीच ठोकले टाळे 

बलात्काराचा गुन्हा दाखल 
पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी शोध घेतला असता संशयित आरोपी अमोल अशोक निमसे (रा. शिरापूर, ता. पाथर्डी) याचे नाव निष्पन्न झाले. त्याने पीडितेला पळवून नेऊन अत्याचार केल्याचेही तपासात समोर आले. या प्रकरणी बलात्कार, अपहरण, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा दराडे यांनी लढविली एकाकी खिंड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School girl kidnapped and rape