Tractor Accident : ट्रॅक्टरखाली सापडून शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; शाळा सुटल्यानंतर घरी आला अन्..

अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
Tractor Accident Shirala
Tractor Accident Shiralaesakal
Summary

चालकाचे लक्ष नसताना तो ट्रॅक्टरच्या फणावर जाऊन बसला, त्याच वेळी ट्रॅक्टरचा फणाचा जोरदार धक्का बसून अनुज खाली पडला.

कोकरूड : येळापूरपैकी सय्यदवाडी (ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरच्या (Tractor) खाली सापडून अतिरक्तस्त्राव झाल्याने येथील अनुज दिलीप पाटील (वय ११) हा शाळकरी मुलगा ठार झाला. ही दुर्घटना काल (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सय्यदवाडी येथील ज्ञानदेव ऊर्फ बाबा पाटील हे त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एमएच २७, एल ९९९) घेऊन सय्यदवाडी येथील वाल्मीक बापू दिंडे यांच्या शेतात फणकट (पाच फणाचा नांगर) मारण्याचे काम करत होते.

Tractor Accident Shirala
Railway News : सातारा-कोरेगाव मार्गावर मालगाडीचे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरले; तीन तास रेल्‍वे वाहतूक ठप्प

या वेळी जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीत शिकणारा अनुज पाटील हा शाळा सुटल्यानंतर घरी आला व घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या वाल्मिकी दिंडे यांच्या शेतात ट्रॅक्टरजवळ गेला. चालकाचे लक्ष नसताना तो ट्रॅक्टरच्या फणावर जाऊन बसला, त्याच वेळी ट्रॅक्टरचा फणाचा जोरदार धक्का बसून अनुज खाली पडला.

Tractor Accident Shirala
मोदी सरकारचं एक पाऊल मागे; आता फक्त 17 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवण्यास केंद्राची परवानगी

अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तरीही त्याला तातडीने कऱ्हाड येथील खासगी रुगणालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले. या दुर्घटनेबाबतचा कऱ्हाड पोलिसांत (Karad Police) गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com