esakal | गर्भवती रात्रभर ताटकळत राहिली दोन्ही जिल्ह्याच्या नाक्‍यावर अन्...

बोलून बातमी शोधा

pregnent

चार महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेला वाळवा तालुक्‍यातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर सुमारे 16 तासांची प्रतीक्षा करावी लागली. इतका वेळ थांबून तिला अखेर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला गेलाच नाही.

गर्भवती रात्रभर ताटकळत राहिली दोन्ही जिल्ह्याच्या नाक्‍यावर अन्...
sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर  : चार महिन्यांची गरोदर असलेल्या एका महिलेला वाळवा तालुक्यातील कोल्हापूर-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर सुमारे 16 तासांची प्रतीक्षा करावी लागली. इतका वेळ थांबून तिला अखेर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला गेलाच नाही. शेवटी त्या महिलेला त्रास होऊ लागल्याने दिसताच वाळवा तालुका आरोग्य विभागानेच तिची जबाबदारी घेतली आणि तिला इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मंगळवारी (ता. 28) ही घटना घडली.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंदिस्त आहेत. बाहेरून आत येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. मंगळवारी पुणे येथून चार महिन्यांची गरोदर असलेली एक महिला आपल्या पतीसोबत आली होती. ते दोघेही पुण्यात नोकरी करतात. इकडे येण्यापूर्वी ती तेथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. जास्तच त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. तिथून निघतांना यांनी संबंधित रुग्णालयाचे पत्र घेतले होते. तिला वारणा-कोडोली (जिल्हा कोल्हापूर) ला जायचे होते. पण कणेगाव (ता. वाळवा) च्या सांगली जिल्ह्याच्या सीमेवर तिला अडवण्यात आले. सोमवारी (ता. 27) रात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास ती तिथे आली होती. ते ज्या रुग्णवाहिकेतून आले त्या वाहिकेच्या चालकाने त्यांना तिथेच सोडून माघारी जाणे पसंत केले. यादरम्यान वाळवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना तेथील व्यक्तीने याबाबत माहिती दिली होती. कोल्हापूरशी संबंधित तिथे सीमेवर असणाऱ्यांनी तिला तिथेच टेंटवर पहाटेपर्यंत थांबवून ठेवले आणि सकाळी मात्र तिकडे प्रवेश देण्यास असमर्थता दर्शवली. दरम्यान डॉ. साकेत पाटील यांनीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला; मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. इस्लामपूर पोलीस प्रशासनाला देखील कल्पना दिली, पण त्या हद्दीतून पलीकडे सोडण्याचा निर्णय हा कोल्हापूर पोलिसांचा असल्याने यांनी हस्तक्षेप केला नाही. आरोग्य विभागाने तिची तपासणीही केली. या सर्व प्रक्रियेत त्या गर्भवती महिलेला चक्कर येऊ लागली आणि हा प्रकार पाहून शेवटी डॉ. साकेत पाटील यांनी तिला इस्लामपूर येथे आणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. वारणा कोडोली येथून तिचे वडील काहीतरी खटपट इस्लामपुरात दाखल झाले आणि त्यांनी तिकडे नेण्याची तयारी दर्शवली. दरम्यान संबंधित महिला, तिचा पती व वडिलांना आज सकाळी आरोग्य विभागाचे पत्र देऊन त्यांची गावाकडे रवानगी केली!

हे पण वाचा - 'ती' कार सांगली हद्दीत घुसली, पोलिसांनी पाठलाग केला तर त्यात दिसलं वेगळंच... 

'त्या' दाम्पत्याची क्वारंटाईनमध्ये रवानगी.
पुणे येथून कोल्हापुरात दाखल झालेल्या या दाम्पत्याची जिल्ह्यात दाखल होताच लगेच चौकशी झाली आणि त्यानंतर लगेच कोल्हापूर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे संबंधित गर्भवती महिलेच्या वडिलांनी दै. सकाळला सांगितले.

हे पण वाचा -  जवानाला थर्ड डिग्री देणे पोलिस उपनिरीक्षकांना पडले चांगलेच महागात 

हे पण वाचा -  गुड न्यूज : भारतातच तयार होणार कोरोनाची लस!