रानात राहून मेंढपाळ दादा घेऊ लागला आता अशी काळजी....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

रानात राहूनही मेंढपाळ घेत आहेत खबरदारी... 
शेतकरी यांच्याबरोबरच रानावनात मेंढ्याबरोबर फिरणारे मेंढपाळही मास्क लावूनच राखण करत आहेत. 

कंग्राळी खुर्द (बळगाव) : सध्या या गावाच्या शिवारात मेंढपाळांचे वास्तव असून त्यांच्याकडून कोरोनाबाबतच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात येत आहेत.

 हेही वाचा-Photo : ओपीडी बंद केल्याने रुग्णांची झाली घालमेल...

मास्क लावूनच राखण

गर्दीच्या ठिकाणी नसूनही मास्क, वरचेवर हात स्वच्छ धुणे यासारखा बाबींकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. सध्या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव जगासह देशात वाढला असून याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. खबरदारी घेण्याचे आवाहन करुनही काही जणांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कोरोना बचाव संदर्भातली काळजी नोकरदार, कारखानदार, राजकीय व्यक्ती, कलावंत, शेतकरी यांच्याबरोबरच रानावनात मेंढ्याबरोबर फिरणारे मेंढपाळही घेत आहेत.

हेही वाचा- गुढीपाडव्याला होणारी राजगड गावातील गाड्याची आणि किल्ल्यावरील यात्रा रद्द...

अतिउत्साही नागरिकांमुळे कोरोनाबाबत निष्काळजीपणा 

कंग्राळी शिवारात श्री. सांबरेकर व त्यांचे साथीदार मेंढ्यांसह वास्तव करत असून त्यांच्याकडून मास्क लावणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, एकमेकांपासून लांब राहणे याचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. शेतकरी, मेंढपाळ यांच्यासारख्या सर्वसामान्यांना कोरोनाचे गांभीर्य कळाले असले, तरी काही व्यक्‍तींकडून निष्काळजीपणा करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shepherds taking precautions even in the desert belgaum marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: