राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

शिवजयंतीच्या तारखेबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. शिवप्रेमी आणि जनतेचा विचार करून एकाच तारखेस शिवजयंती झाली पाहिजे. तसेच निश्चित हाेणारी तारीख सर्वांनी मान्य करावयास हवी असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी व्यक्त केले. 

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा वाद थांबविणे गरजेचे आहे. शिवजयंती राज्यात तसेच देशात मोठ्या प्रमाणात साजरी झाली पाहिजे. परंतु, तारखांचा वाद निर्माण झाला आहे. यातून शिवछत्रपतींचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे शल्य आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडले. सर्वांनी शिवजयंतीची एकच तारीख निश्‍चित करून त्याच दिवशी दिमाखात शिवजयंती साजरी करायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राज्यात पुन्हा शिवजयंती साजरी करण्याविषयी मतमतांरे व्यक्त हाेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध तारखांना साजरी केली जाते. याबाबत माध्यमांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचे वंशज म्हणून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना विचारले असता आमदार भाेसले भावविश झाले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्येकजण मानतो. प्रत्येक जाती, धर्माचे लोकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आदराची भावना आहे. परंतु जयंतीच्या तारखेच्या वादामुळे त्यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. खरंतर शासनाने 19 फेब्रुवारी शिवजयंतीची तारीख जाहीर केली आहे. परंतु, काही शिवप्रेमींना हे मान्य नाही. त्यामुळे शिवजयंती वेगवेगळ्या तारखेस साजरी हाेत आहे. खरंतर जयंतीच्या तारखेचा वाद मिटवून एकच शिवजयंती होईल यासाठी प्रयत्न व्हावेत असे शिवप्रेमी तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील व्यक्ती म्हणून मला वैयक्तिक वाटत नाही तर प्रत्येक शिवभक्ताची ती भावना आहे.
 
याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. शिवप्रेमी आणि जनतेचा विचार करून एकाच तारखेस शिवजयंती झाली पाहिजे. तसेच निश्चित हाेणारी तारीख सर्वांनी मान्य करावयास हवी असे मत आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केले. 

हेही वाचा - तिथीनुसार शिवसैनिकांनी शिवजयंती केल्यास दुटप्पीपणा
 
हेही वाचा -  शिवजयंतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलं हे आवाहन...

हेही वाचा - शिवाजी महाराज हा विचार प्रत्येक मराठी मनात जगलाच पाहिजे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinghraje Comments On Shivjayanti Date