Shivjayanti festival 2020 allocution  in islampur sangli marathi news
 Shivjayanti festival 2020 allocution in islampur sangli marathi news

इंदोरीकर महाराजांवर अमोल मिटकरी यांचे मोठें विधान...

इस्लामपूर (सांगली) :  आंबा खाल्ल्यावर मुलगा होतो असं सांगणाऱ्यांवर कोणताही आरोप झाला नाही आणि समाजप्रबोधन करणाऱ्या इंदोरीकर महाराजांच्यावर मात्र आरोप आणि कारवाईची मागणी होते, असा भेदभाव का? प्रस्थापितांवर मात करायची असेल तर धर्मग्रंथांची साथ घेता कामा नये, धर्मनिरपेक्षतेला महत्त्व हवे, असे प्रतिपादन प्रा. अमोल मिटकरी यांनी केले. 

येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनीतर्फे शिवजयंती उत्सव 2020 अंतर्गत आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. डी. पाटील, उपाध्यक्ष ऍड. एन. आर. पाटील, सचिव सरोज पाटील (माई), प्रभारी प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, प्राचार्य डॉ. मोहन राजमाने प्रमुख उपस्थित होते. 

शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग मोठा आहे.
प्रा. मिटकरी म्हणाले,"महाराष्ट्रात लोकांची मानसिकता अत्यंत खालावली आहे. महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे असे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला देखील वाईट वाटते. शिवाजी महाराजांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र त्यांचे विचार आचरणात आणणारे फार कमी आहेत. आपण 21 व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. आत्ता आलेला कोरोना व्हायरस एकवेळ बरा, पण मोबाईल हा व्हायरस नको म्हणायची वेळ आली आहे.

वृध्दाश्रम वाढणे चिंताजनक बाब

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, अभ्यासाचे योग्य नियोजन या गोष्टींचा प्राधान्याने विचार करायला हवा. शिवाजी महाराजांना ज्या प्रमाणे स्वकीयांचा विरोध होता त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना जवळच्या समाजातूनच विरोध होत असतो. त्याकडे लक्ष न देता परिस्थितीशी झुंजत यश गाठण्याची गरज आहे. वृध्दाश्रम वाढणे ही चिंताजनक बाब आहे. आई-वडिलांच्या अंत्यसंस्काराला मुलांना यायला वेळ देखील नाही. हे चुकीचे आहे. असे घडता कामा नये. शिवाजी महाराजांची नाळ शेतकऱ्यांशी जोडलेली होती.

सकारात्मक विचार ठेवा

त्याच प्रमाणे तुम्ही जरी आयएएस झाला तरी तुमची नाळ शेतकऱ्यांशी जोडलेली असली पाहिजे, तरच सर्वांचा विकास शक्‍य आहे. मनातून हरलात तर तुम्ही कधीच जिंकणार नाही. त्यासाठी कायम सकारात्मक विचार ठेवा. अभ्यासात सातत्य हवे. मराठी बरोबरच इतर भाषाही महत्त्वाच्या आहेत. बहुभाषिक व्यक्तिमत्त्व विकसित करा.'' प्रबोधिनीचे केंद्र संचालक प्रा. अजितकुमार पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com