सोलापुरात शिवसेना भाजपचा "गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा' 

अशोक मुरूमकर
Saturday, 11 January 2020

नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका आणि जिल्हा परिषद या दोन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत. नागरिक आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून त्या काम करतात. महापालिका ही शहरातील व जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरवते. त्यांना मिनी मंत्रालय म्हणूनही ओळखले जाते. या मिनी मंत्रालयात सध्या एकमेकांचे विरोधक झालेले शिवसेना व भाजप एकत्रितपणे काम करत आहेत.

सोलापूर : "गल्लीत गोंधळ अन्‌ दिल्लीत मुजरा' हा राजकारणावर बेतलेला मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला. राजकारण्यांच्या चित्र-विचित्र चालींवर बोट ठेवणारा हा चित्रपट सध्या सोलापूरकरांना वास्तवात पाहायला मिळत आहे. निमित्तही तसंच आहे... एकेकाळचे कट्टर मित्र असलेले भाजप, शिवसेना आता कट्टर शत्रू झाले आहेत. पण, ही झाली राज्यातील स्थिती. सोलापुरात मात्र यांच्या दोस्तीला नव्याने धुमारे फुटल्याचे दिसून येत आहे. अर्थात त्याला निमित्त सत्तासुंदरीचे असले तरी यातून राज्यभरात मात्र "गल्लीत दोस्ती आणि मुंबईत कुस्ती' असाच संदेश गेल्याचे दिसते. 

हेही वाचा- मंगळवेढा तालुक्‍यातील कॉंग्रेस का गेली कोमात? 
पाच सदस्य असताना झेडपीत शिवसेना 

नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिका आणि जिल्हा परिषद या दोन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत. नागरिक आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून त्या काम करतात. महापालिका ही शहरातील व जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरवते. त्यांना मिनी मंत्रालय म्हणूनही ओळखले जाते. या मिनी मंत्रालयात सध्या एकमेकांचे विरोधक झालेले शिवसेना व भाजप एकत्रितपणे काम करत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप व शिवसेनेची युती होती. त्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवलीही. त्यांना स्पष्ट बहुमत असतानाही केवळ मुख्यमंत्रिपदावरून युती फिसकटली. दरम्यान शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनपेक्षितपणे एकत्र येऊन "कॉमन मिनिमम' कार्यक्रम आखत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन केले आणि सर्वांत जास्त जागा घेणाऱ्या भाजपला विरोधी पक्षात बसवले. मात्र, हा पॅटर्न सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेत चालला नाही. जिल्हा परिषदेमध्ये केवळ पाच सदस्य असताना भाजपच्या पाठिंब्याने अनिरुद्ध कांबळे हे अध्यक्ष झाले. महापालिकेच्या महापौर निवडीमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकामुळे श्रीकांचना यन्नम या महापौर झाल्या. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत यशस्वी खेळी करत स्थानिक नेत्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सत्तेपासून रोखले आहे. 

हेही वाचा- राष्ट्रवादी "येथे' गुंडाळला महाआघाडीचा फॉम्युला 
महापालिकेची स्थिती... 

सोलापूर महापालिकेत 102 सदस्य आहेत. त्यातील 49 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यानंतर शिवसेनेचे 21, कॉंग्रेस 14, एमआयएम नऊ, राष्ट्रवादी चार, बसप एक, माकप एक व वंचित बहुजन आघाडीचे तीन नगरसेवक आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्येसुद्धा त्यांचीच सत्ता येईल असा विश्‍वास व्यक्त केला जात होता. मात्र, स्थानिक पातळीवर हा पॅटर्न चालला नाही. येथे शिवसेनेमुळेच भाजपचा महापौर झाला आहे. 

जिल्हा परिषदेमधील स्थिती... 
जिल्हा परिषदेमध्ये 68 सदस्य आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक म्हणजे 23 सदस्य आहेत. त्यानंतर भाजपचे 14, कॉंग्रेस सात, शिवसेना पाच, स्थानिक आघाड्या 16 व अपक्ष तीन सदस्य आहेत. यामध्ये माळशिरस तालुक्‍यात 11 पैकी आठ जागा राष्ट्रवादीकडे आहेत. मात्र, त्यातील बहुतांश सदस्य मोहिते-पाटील यांना मानणारे आहेत. करमाळा तालुक्‍यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचपैकी चार जागा शिवसेनेला मिळाल्या. मात्र, येथेही मोहिते-पाटील समर्थक जास्त आहेत. माढ्यात बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सात जागा मिळवल्या होत्या. सांगोला तालुक्‍यात शेकापचे गणपतराव देशमुख व दीपक साळुंखे यांनी सातपैकी पाच जागा जिंकत शिवसेनेला रोखले होते. पंढरपूर तालुक्‍यात जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी सात जागा परिचारक गटाने जिंकल्या. येथे कॉंग्रेसला एकही जागा नाही. अक्कलकोटमध्ये सहापैकी कॉंग्रेसने तीन जागा मिळवल्या. मंगळवेढा तालुक्‍यात शिवसेनापुरस्कृत समाधान आवताडे गटाला चारपैकी तीन जागा मिळाल्या होत्या. येथेही भाजपच्या पाठिंब्याने शिवसेनेचा अध्यक्ष झाला आहे. 

झेडपी सेनेची, पालिका भाजपची 
महाविकास आघाडीचा पॅटर्न सोलापूर जिल्ह्यात न चालल्याने बहुमत असूनसुद्धा कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला सत्ता स्थापन करता आली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena BJP alliance in Solapur