Video : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतावेळी उधळले पैसे!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोलीबाजा लावून नृत्य करत पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

सोलापूर : शिवसेनेचे नुतन प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, धनंजय डिकोळे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांचे सोमवारी शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. या स्वागतावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी ढोली बाजासमोर नाचत पैसे उधळल्याचा प्रकार घडला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्र

पाहा व्हायरल व्हिडिओ...

ढोलीबाजा लावून नृत्य​
शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या स्वागतावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला. शिवसेना पदाधिकारी प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, सुरेश जगताप, अतुल भवर, आशुतोष बरडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोलीबाजा लावून नृत्य करत पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

मी तिथे हजर नव्हतो
"आमच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते जमले होते. स्वागतावेळी उत्साहात नाचणाऱ्या लोकांनी पैसे उधळल्याचा व्हिडीओ मी पाहिला आहे. मी तिथे हजर नव्हतो. कोणीतरी मुद्दामहून अशा लोकांना पाठविले असण्याची शक्‍यता आहे,' असे प्रभारी जिल्हाप्रमुख बरडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा - बापरे..मुलांनीच केला वडिलांचा खून! कारण...

डिजिटल फलकाची रंगली चर्चा
दरम्यान, प्रभारी जिल्हाप्रमुख बरडे यांच्या स्वागतासाठी उत्साही कार्यकर्त्यांनी "आला आला.. तुमच्या सगळ्यांचा बाप आला..' असे वाक्‍य लिहीलेले डिजीटल फलक लावले होते. याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्यानंतर कार्यकर्त्यांनी "शिवसेनेचा वाघ आला..' असा मजकुर मूळ डिजीटल फलकावर चिटकावल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Padadhikari welcome