

सांगलीत धक्कादायक घटना; प्रसादने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढला अन्
esakal
Sangli Crime News : विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. निखिल रवींद्र साबळे (वय २५, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयित हल्लेखोर मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. सांगली) दुचाकीवरून पसार झाला आहे. दोघेही सर्व्हिसिंग सेंटर चालवत असून, त्यातून आर्थिक वादाची किनार या खुनामागे असण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, शंभर फुटीरस्त्यावरील खाऊ गल्लीत रात्री साडेसातच्या सुमारास झालेल्या खुनामुळे खळबळ उडाली. परिसरात गर्दी जमा झाली होती. रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबागचे पथक संशयिताच्या मागावर होते.