Video : आश्विनी बाळा, काळजी करु नकाेस देश तुझ्या पाठीशी आहे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

वुहानमध्ये साताऱ्याची आश्‍विनी पाटीलने सोमवारी सकाळी एक व्हिडीओ प्रसारित केला हाेता. यामध्ये आम्हांला भारत सरकारने येथून लवकर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली हाेती.

कराड ः आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी वूहानमधील साताऱ्याच्या आश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तिला दिलासा दिला. वुहान येथील उपलब्ध सुविधांबद्दल माहिती घेतली. तिला आश्वासक धीर दिला. चीनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुम्हांला लवकरात लवकर मुंबईमध्ये आणण्याबद्दल जितके शक्‍य आहे तितके प्रयत्न करेन असा आश्वासनात्मक संवाद साधला. यादरम्यान कोणतीही अडचण आली तर मला थेट संपर्क साधावा असे आमदार चव्हाण यांनी नमूद केले.

मूळची साताऱ्याची असलेल्या आश्‍विनी पाटील या विवाहित युवतीसह भारतातील 70 जण अद्याप चीनमधील वुहान प्रांतात अडकून पडले आहेत. आश्‍विनीने सोमवारी सकाळी एक व्हिडीओ प्रसारित केला. यामध्ये आम्हांला भारत सरकारने येथून लवकर न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ई - सकाळने आश्विनीच्या धैर्याची कथा जगासमाेर आणली. आज (मंगळवार) सकाळने  वुहानमधील परिस्थितीशी झुंज देत असलेल्या आश्विनीचे वृत्त प्रसिद्ध केले. सातारासह राज्यातील नेत्यांनी, नागरीकांना आश्विनी आणि तेथील भारतीय नागरीकांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

 

जरुर वाचा : धैर्यवान अश्विनी पाटीलचा थरारक अनुभव

हेही वाचा : अखेर डॅडींनीच केला त्याचा खून

अवश्य वाचा : सचिन तेंडूलकरकडे सातारची ही जबाबदारी ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prithviraj Chavan Assured Ashwini Patil To Bring Back In India