... तर सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या "इतकी' होणार 

... तर सोलापूर महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या "इतकी' होणार 

सोलापूर ः आगामी महापालिका निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने झाल्यास सध्याच्या जणगणनेनुसार 102 प्रभाग होतील. 2022 मध्ये अपेक्षित असलेल्या निवडणुकीत 2021 ची लोकसंख्या गृहीत धरली प्रभाग संख्येत आणखीन वाढ होऊन ही संख्या 110 ते 115 पर्यंत जाऊ शकते.

सत्तांतरामुळे बदलाचा निर्णय 
राज्यात सत्तांतर झाल्यावर महापालिका निवडणुकी बहुसदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्णय युती सरकारने घेतला. यापूर्वी 2002 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीही तीन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेतल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यात बदल करण्यात येऊन दोन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी चार सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला. त्यामुळे प्रभागांची संख्या 26 झाली तरी सदस्यांची संख्या मात्र 102 होती. 26 पैकी दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन सदस्य आहेत. आता पुन्हा एक सदस्यीय पद्धतीने निवडणुका घ्यायच्या झाल्यास प्रभाग रचना पुन्हा बदलणार आहे. 

शासन व निवडणूक आयोगाच्या चर्चेनंतर होतो अंतिम निर्णय 
निवडणूक कशी घ्यायची याचा निर्णय अगोदर शासनाच्या स्तरावर घेतला जातो. त्यानंतर निवडणूक आयोगाशी चर्चा करून त्याला मूर्त स्वरुप दिले जाते. निवडणूक कशी घ्यायची यावर राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचे एकमत झाल्यावर आयोगाच्या ताब्यात संपूर्ण यंत्रणा दिली जात. निवडणुकीचे काम आयोगाने ताब्यात घेतल्यानंतर वॉर्ड रचना किंवा प्रभाग रचनेचे काम सुरू केले जाते. आरक्षण निश्‍चितीबरोबरच मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जातो. वॉर्ड किंवा प्रभाग रचना झाल्यावर आणि आरक्षण निश्‍चित झाल्यावर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम आयोगाच्या माध्यमातून जाहीर केला जातो. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे भाजपला अधिक फायदेशीर ठरत असल्यानेच महाविकास आघाडीने पुन्हा प्रत्येक प्रभागात एकच नगरसेवक निवडण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रभाग सदस्य संख्येत 2002 पासून असे झाले बदल 
सन 2002 ः महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत 
सन 2007 ः महापालिकांतील बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्द 
सन 2012 ः महापालिकांमध्ये पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पद्धत. एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून देण्याची तरतूद 
सन 2017 ः बहुसदस्यीय प्रभाग पद्धत कायम. पण, एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून देण्याची तरतूद. 
सन 2017 ः बहुसदस्यीय प्रभाग पद्धत रद्दचा निर्णय, एक सदस्यीय पद्धतीची शिफारस. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com