esakal | पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 
sakal

बोलून बातमी शोधा

bjp.jpg

एकीकडे निष्ठावान नगरसेवकांना सत्तेच्या पदापासून दूर ठेवले जाते, तर दुसरीकडे पक्षाच्या भूमिकेविरोधात काम करूनही सत्तेची पदे दिली जातात. पक्षाकडून झालेले चुकीचे निर्णय, आतापर्यंत फुटीर नगरसेवकांनाच सत्तेची पदे कशी दिली गेली, याचा पाढा वाचला गेला. अडीच वर्षांत सत्ता असूनही कामे न झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

पक्षातून फुटलेल्यांना पदे...अन् आम्हाला फक्त शिस्तीचे धडे काय? 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाच्या सत्तेच्या दुसऱ्या टर्ममधील होणाऱ्या पहिल्याच बैठकीत सदस्यांच्या संतापाचा बांध फुटला. महासभेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत शिस्तीचे धडे देण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांच्या अंगलट आला. एकीकडे शिस्तीचे धडे दिले जात असताना निवडणुकीत फुटलेल्या अकरा नगरसेवकांवर काय कारवाई केली? पक्षातून फुटलेल्यांना पदे मिळत असतील, तर आम्ही फक्त शिस्तीचे धडेच गिरवायचे का? या प्रश्‍नाने पदाधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. पक्षाकडून योग्यवेळी कारवाई होईल, असे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त सदस्यांच्या पचनी ते पडले नाही. 

आतापर्यंत फुटीर नगरसेवकांनाच सत्तेची पदे कशी दिली गेली​?

महापौर, उपमहापौरांची निवड झाल्यानंतर शुक्रवारी (ता. 20) पहिलीच महासभा होत आहे. परंपरेनुसार महासभेपूर्वी गटनेते सदस्यांची बैठक घेऊन महासभेत कुठल्या विषयावर काय भूमिका घ्यायची, याचे नियोजन करतात. महासभेच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (ता. 19) भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. बैठकीला भाजपचे 65 नगरसेवक उपस्थित राहणे अपेक्षित असताना फक्त 35 नगरसेवक उपस्थित होते. अनुपस्थित नगरसेवकांमध्ये माजी महापौर रंजना भानसी व माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांचा समावेश होता. त्याचबरोबर माजी आमदार बाळासाहेब सानपसमर्थक अकरा नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याचा धागा पकडत एकीकडे निष्ठावान नगरसेवकांना सत्तेच्या पदापासून दूर ठेवले जाते, तर दुसरीकडे पक्षाच्या भूमिकेविरोधात काम करूनही सत्तेची पदे दिली जातात. पक्षाकडून झालेले चुकीचे निर्णय, आतापर्यंत फुटीर नगरसेवकांनाच सत्तेची पदे कशी दिली गेली, याचा पाढा वाचला गेला. अडीच वर्षांत सत्ता असूनही कामे न झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृहनेते सतीश सोनवणे, शिवाजी गांगुर्डे, हिमगौरी आडके आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

जरूर वाचा-त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ-भुजबळ 

महापौरांचा प्रभागनिहाय दौरा 
नगरसेवकांकडून विकासकामे होत नसल्याची तक्रार केल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवकांना विकासकामांबाबत आश्‍वासित करताना समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागनिहाय दौरा करणार असल्याचे सांगितल्याचे समजते. शुक्रवारी (ता. 19) होणाऱ्या महासभेत त्याबाबत घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा >  शिक्षकाच्या खोलीतून वाफा बाहेर येत होत्या... त्यांनी खिडकीचा कप्पा उघडून पाहिला तर धक्काच!

हेही वाचा > video > स्मशानभूमीत केला वाढदिवस साजरा...त्यानंतर अचानक