ऊस दरावरून मंगळवेढ्यात उडाला भडका; शेतकरी संतप्त

हुकूम मुलाणी
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

तालुक्यातील भिमा नदीकाठावरील सिध्दापूर व अरळी या दोन ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना ऊस न घालण्याचा एकमुखी ठराव केला होता. गतवर्षी कारखाने चालू होण्यापूर्वी सर्वच कारखान्यांनी दर जाहीर केले होते.

मंगळवेढा : उसाला 3400 दर दिल्याशिवाय कोयता लावू दिला जाणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता दरम्यान जिल्हयातील साखर कारखान्यांनी अद्यापही ऊसाचे दर जाहीर न केल्याने आज सोमवारी सकाळी अरळीतील शेतकर्‍यांनी उसाने भरलेल्या ट्राॅलीची हवा शेतकर्‍यांनी सोडल्याने ऊस दरावरून शेतकय्रांचा भडका मंगळवेढ्यात उडाला 

अरळी येथे ऊसतोड करून ट्रोली भरून जात असताना माजी सरपंच मलसिध्द कुंभार, अँड.राजाराम चव्हाण, आप्पासो हेगडकर, कोली मेजर, मल्लिकार्जुन सोनगोंडे, बंडू ढाणे, अशोक कुंभार आदि १०० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी या आंदोलनात सहभाग घेतला 

तालुक्यातील भिमा नदीकाठावरील सिध्दापूर व अरळी या दोन ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेऊन ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखान्यांना ऊस न घालण्याचा एकमुखी ठराव केला होता. गतवर्षी कारखाने चालू होण्यापूर्वी सर्वच कारखान्यांनी दर जाहीर केले होते. कारखाने सुरू होण्यास एक दिवस बाकी असतानाही अद्याप तालुक्यातील कुठल्याच साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर न केल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या ऊसाला प्रतिक्विंटलला दर किती मिळणार याबाबत ते अभिज्ञ आहेत. तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, तामदर्डी, रहाटेवाडी, बोराळे, अरळी, सिध्दापूर, नंदूर हे क्षेत्र भिमा नदी खोर्‍यातील असल्यामुळे येथे मोठया प्रमाणात ऊस उत्पादित केला जातो.

या भागावर तालुक्याबरोबर अन्य कारखान्यांचाही लक्ष असते सिध्दापूर व अरळी ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलावून ऊसाच्या उत्पादन खर्चाच्या प्रमाणात दर मिळणे आवश्यक आहे. कोणत्याही कारखान्याने दर किती देणार हे अद्याप जाहीर केले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये सभ्रमावस्था असून या ग्रामसभेत होवून उच्चतम दर घोषित झाल्याशिवाय ऊसाला कोयता लावू न देण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: solapur news farmers agitation sugarcane rates mangalvedha