"याचा' विद्यापीठाने केला नुसताच गवगवा

तात्या लांडगे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शासनाच्या निर्देशानुसार दत्तक गाव योजनेअंतर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सहा गावांची निवड केली. त्यामध्ये बीबी दारफळ, हिरज (ता. उत्तर सोलापूर), मळेगाव (ता. बार्शी), वाळूज (ता. मोहोळ), निमगाव टें. (ता. माढा) व होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) या सहा गावांचा समावेश होता. सुरवातीला योजनेचा गवगवा झाला, मात्र मागील दोन वर्षांत या गावांकडे विद्यापीठाचे कोणतेच अधिकारी फिरकले नाहीत. परंतु गावकऱ्यांचा सहभाग नसल्याचे कारण विद्यापीठाने पुढे केले आहे.

सोलापूर : शासनाच्या निर्देशानुसार दत्तक गाव योजनेअंतर्गत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने सहा गावांची निवड केली. त्यामध्ये बीबी दारफळ, हिरज (ता. उत्तर सोलापूर), मळेगाव (ता. बार्शी), वाळूज (ता. मोहोळ), निमगाव टें. (ता. माढा) व होनमुर्गी (ता. दक्षिण सोलापूर) या सहा गावांचा समावेश होता. सुरवातीला योजनेचा गवगवा झाला, मात्र मागील दोन वर्षांत या गावांकडे विद्यापीठाचे कोणतेच अधिकारी फिरकले नाहीत. परंतु गावकऱ्यांचा सहभाग नसल्याचे कारण विद्यापीठाने पुढे केले आहे. 

सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम

विद्यापीठाच्या पुढाकारातून प्रत्येक पाच वर्षी किमान पाच गावे दत्तक घेऊन विकासकामे करावीत, अशा सूचना शासनाने दिल्या. गावकऱ्यांनी सुचविलेल्या कामांचा आराखडा तयार करून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून लोकसहभाग घेऊन विकासकामे करण्याची ही योजना होती. त्यानुसार 2014 - 15 मध्ये सोलापूर विद्यापीठाने जिल्ह्यातील सहा गावांची निवड केली. पहिली दोन वर्षे जोमाने काम केले, सरपंचांना बोलावून विद्यापीठात सत्कारही केला. काही गावांना प्रत्येकी 70 हजारांचा निधीही उपलब्ध करून दिला. मात्र दिलेल्या निधीचा हिशेब गावांनी दिला नाही, लोकसहभाग कमी असल्याची कारणे पुढे करीत विद्यापीठ प्रशासनाने या योजनेकडे पाठ फिरवली. या योजनेची मुदत मार्च 2019 मध्ये संपली असून आता नव्याने गावे निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता, मात्र लोकसहभागाचा अंदाज घेऊन त्या गावांची निवड केली जाईल, असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 
ठळक बाबी... 
- दत्तक गाव योजनेकडे विद्यापीठाने शेवटच्या टप्प्यात फिरवली पाठ 
- लोकसहभाग कमी, दिलेल्या पैशाचा हिशेब दिला नसल्याचे कारण केले पुढे 
- पाच वर्षांपूर्वी विद्यापीठाने दत्तक घेतलेली गावे विकासकामांपासून दूरच 
- आगामी पाच वर्षांसाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्याचे नवे नियोजन 
- लोकसहभाग सर्वाधिक असलेल्या गावांचीच निवड केली जाणार : श्रमदानाला राहणार प्राधान्य 

दत्तक गाव योजनेची मुदत मार्च 2019 मध्ये संपली असून आता नव्याने गावांची निवड करण्याचे नियोजन आहे. लोकसहभागातून गावांचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्‍वास आहे. त्यासाठी संबंधित गावांमधील गावकऱ्यांनीही साथ द्यायला हवी. 
- डॉ. गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, सोलापूर विद्यापीठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur universitys ideal village planing