
सोलापूर/माढा/पिंपळनेर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर वाहतूक व्यवस्था बंद केल्यामुळे विविध भागात हजारो पर्यटक अडकून पडले आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील १०० पर्यटक विविध भागात अडकल्याची माहिती समोर आली आहे. ते सर्वजण सुखरुप असल्याची माहिती जिल्हाधिकरी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जम्मू-कश्मीरमध्ये अडकून पडलेल्यांमध्ये माढा, पंढरपूर, माळशिरस, उत्तर सोलापूर तालुक्यातील पर्यटकांचा समावेश आहे.