Solapur News : नव उद्योजकांचे १४०० कोटींचे गुंतवणूक करार ; चार हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी

येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत जिल्ह्यातील नव उद्योजकांनी राज्य शासनासमवेत एक हजार ४८१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहे.
Solapur News
Solapur Newssakal

सोलापूर : येथील जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा गुंतवणूकदार परिषदेत जिल्ह्यातील नव उद्योजकांनी राज्य शासनासमवेत एक हजार ४८१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहे. या उद्योगांच्या माध्यमातून भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे.

येथील बालाजी सरोवर सभागृहात आज (ता. ६) जिल्हा गुंतवणूकदार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, जिल्हा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी वसुंधरा जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले, सोलापूरकडे आता गुंतवणूकदारांनी एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहायला हवे. सोलापुरात आजही भरपूर जागा उद्योगासाठी उपलब्ध आहे. मोठ्या संख्येने कामगाराची उपलब्धता आहे. वीज पुरवठ्यासाठी एनटीपीसी आहे. पुणे-मुंबईप्रमाणे दाट वस्ती व अपुरी जागेचा प्रश्न नाही.

उद्योग विकासाला चालना देण्यासाठी कोणतीच अडचण नाही. त्यामुळे लोकांनी उद्योगवाढीसाठी पुढाकार घ्यावा. प्रशासन किंवा राजकीय क्षेत्र या दोन्हीकडून उद्योगवाढीसाठी असलेली आस्था ही त्यासाठी पूरक आहे. या शिवाय उत्तम रस्त्याचे आंतरराज्य नेटवर्क आहे. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत कामगारांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी विशेष प्रचार मोहीम राबवत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष कोलते यांनी केले.

दिवसभरात झालेल्या सत्रामध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी राज्य शासनाच्या उद्योग धोरणावर माहिती दिली. सीए सचिन भट्टड यांनी एमएसएमई उद्योगाचे लिस्टेड उद्योगात रूपांतपण व त्याचे लाभ या विषयावर भाष्य केले. अलिबाबा डॉट कॉमचे उद्योग मार्गदर्शक अमित जैन यांनी डिजिटल मार्केटिंगवर विचार मांडले.

नंतरच्या सत्रात राष्ट्रीय ज्वारी संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. परशुराम पत्रोती व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड व सोलापूर टेक्स्टाईल क्लस्टरचे गोविंद झंवर यांनी विचार मांडले. परिषदेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार साळुंके, मिटकॉनचे अधिकारी चंद्रकांत लोंढे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com