esakal | "मुंबई'साठी सोलापुरात 163 पैकी 162 मतदान 
sakal

बोलून बातमी शोधा

apmc election

महाविकासचा विजय निश्‍चित 
पुणे महसूल विभागातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांवर कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्‍चित मानला जात आहे. 

"मुंबई'साठी सोलापुरात 163 पैकी 162 मतदान 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : मुंबई कृषी बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी आज सकाळी 8 ते सायंकाळी पाच या वेळेत राज्यभर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील बाजार समितीच्या संचालकांना मतदान करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. मुंबई बाजार समितीच्या पुणे महसूल विभाग मतदार संघातील उमेदवारांसाठी सोलापुरातील मतदारांनी आज मतदान केले. सोलापूर जिल्ह्यातील 163 मतदारांपैकी 162 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 
हेही वाचा - सोलापुरात लढायला दुसरे महास्वामी म्हणतात "मै हु ना' 
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल काशीद यांनी आजच्या निवडणुकीसाठी मतदान केले नाही. पुणे महसूल विभाग या मतदार संघातून एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. राज्य सरकारमध्ये सत्तेवर असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढविली. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कपबशीचे चिन्ह देण्यात आले होते. पुणे महसूल विभाग मतदार संघातून कोरेगावचे (जि. सातारा) बाळासाहेब सोळस्कर (पाटील) व भोरचे (जि. पुणे) धनंजय वाडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचाराच्या माध्यमातून या दोन्ही उमेदवारांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या बाजार समित्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. या दोन मुख्य उमेदवारांशिवाय छत्री चिन्हावर चंद्रसेन काटकर, अंगठी चिन्हावर प्रदीपकुमार खोपडे आणि किटली चिन्हावर महादेव यादव अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले होते.

loading image