
-राजकुमार शहा
मोहोळ: मोहोळ विधानसभा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यां साठी आमदार राजु खरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्या मुळे, राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी "मातोश्री ग्रामसमूह पाणंद रस्ते योजने"अंतर्गत मोहोळ मतदार संघासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राजु खरे यांनी दिली.