Mohol Taluka Tightens Security for Ganesh Festival; 29 Persons ExternedSakal
सोलापूर
Solapur Crime: 'मोहोळ तालुक्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 जण तडीपार'; 96 जणांकडून घेतले चांगल्या वर्तनुकीचे बॉण्ड
Ganeshotsav Security in Mohol: प्रत्येक गणेश मंडळांना नोटीसा देऊन उत्सवाचे अनुषंगाने आचारसंहिता व नियमांचे पालन करण्याचे तसेच, ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेश स्थापने दिवशी दहा मंडळांनी मिरवणुका काढून गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.
-राजकुमार शहा
मोहोळ: मोहोळ तालुक्यातील गणेशोत्सव निर्भय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, एकूण 76 पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड चा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 29 जणांना तडीपार करण्यात आले आहे, तर 90 जणां कडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड लिहून घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.