
माळीनगर : साखर हंगाम संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे त्यांनी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेल्या दराप्रमाणे किंवा दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार एप्रिलअखेर शेतकऱ्यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अजूनही अडकली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी थकीत ऊसबिलाच्या प्रतीक्षेत आहेत.