
सोलापूर : नेहरू नगर व सलगर वस्तीतील शेतजमिनीच्या दस्तात परस्पर फेरबदल करून मोबदल्याची सहा कोटी रुपये न देता जमीन स्वतःच्या नावे लिहून घेऊन दोघा भावांची फसवणूक केल्याप्रकरणी राहुल विष्णू लाड व राजेंद्र तुकाराम थोरवे (दोघेही रा. पुणे) यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अटक झाली होती. त्यांनी दाखल केलेला जामीन अर्ज प्रथम न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी फेटाळून लावला.