बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police
बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा

बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा

सोलापूर : शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर आता उद्यापासून (सोमवारी) विशेष मोहिमेतून बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक दिपक आर्वे यांनी त्यासंबंधीचे स्वतंत्र आदेश रविवारी काढले.परिवहन आयुक्‍तालयाने (Commissioner of Transport)बेशिस्त वाहनांवरील दंडात्मक रकमेत मोठी वाढ केली आहे. त्याचा आधार घेऊन पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी शहरातील अपघात व बेशिस्त वाहनधारकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने अगोदर प्रबोधन आणि नंतर दंडात्मक कारवाई सुरु केली होती.

हेही वाचा: Punjab Election : काँग्रेसनंतर आता भाजपचीही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

मात्र, आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवेदनानंतर कारवाई थांबविण्यात आली. मात्र, सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर एक-दोन किलोमीटर अंतरावर प्रवास करताना शेकडोवेळा ब्रेक लावावा लागतो, असा अनुभव अनेकांना येतो. वेगात जाणारी रिक्षा अचानक रस्त्यावरच उभी केली जाते. दुसरीकडे दुचाकीस्वारांकडूनही अनेकदा नियमांचा भंग केला जातो. रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी व माल वाहून नेला जातो. रस्ते अपघातात सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या पाचमध्ये आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत, बेशिस्तांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने शहर पोलिस आयुक्‍तांनी पुन्हा कारवाईची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. हेल्मेट, ट्रिपलसीट, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, मोबाइल टॉकिंग, वाहनाचा विमा नाही, वाहन चालविण्याचा परवाना नाही, अशा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाणार असून रोखीने अथवा ऑनलाइन पध्दतीने जागेवर दंड न भरणाऱ्यांची वाहने जमा केली जाणार आहेत.(solapur news)

हेही वाचा: मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझीचा कराचीत मृत्यू - सूत्र

लोकप्रतिनिधींचा राखला मान, आता...

कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या, आता तिसरी लाट सुरु झाली. सोलापूर शहरात हातावरील पोट असलेल्यांची संख्या लक्षणीय असून दोनवेळचे जेवण मिळविण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरु असतो. निर्बंधांमुळे अनेकांचा रोजगार गेला तर काहींना व्यवसायात भुर्दंड बसला. अशा परिस्थितीत शहर पोलिसांनी सुरु केलेली दंडात्मक कारवाई, वाढीव दंड आकारु नये, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिस आयुक्‍तांकडे केली होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत हा विषय गेला आणि लोकप्रतिनिधींच्या शब्दाचा मान राखून कारवाईला काही दिवस ब्रेक लागला. मात्र, काही दिवस थांबल्यानंतर पोलिस आयुक्‍तांनी ही कारवाई पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Action Unruly Vehicles From Today Vehicle Seize Penalty Not Paid On The Spot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..