

Resounding Win for Adv. Milind Thobde as He Retains Bar Council Seat for the Third Time
sakal
सोलापूर: महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांनी दणदणीत विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा सदस्यपद पटकावले. यामुळे त्यांच्या नावावर विजयी हॅट्ट्रिकची नोंद झाली आहे. मुंबई येथे शनिवारी (ता. ६) जाहीर झालेल्या निकालात त्यांनी पहिल्या पसंतीची ३ हजार ८२९ मते मिळवत पाचव्या क्रमांकाने विजय मिळविला. तर सोलापूरच्या अन्य सहाजणांना पराभव पत्करावा लागला.