Ashadhi Wari 2026 MSRTC special buses
esakal
सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुकर प्रवासासाठी एसटीने दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणत्याही गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास, त्यांना थेट (MSRTC special buses for Pandharpur Wari) त्यांच्या गावातूनच पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या विशेष नियोजनाची अधिकृत घोषणा केली असून, वारीसाठी एसटीने साडेपाच हजार विशेष बसचे नियोजन केले आहे.