Solapur Shock BJP Leader Named in Murder Attempt on Shinde Camp Leader Mahesh Chivate
Esakal
सोलापूर
एकनाथ शिंदेंच्या सर्वात जवळचे मंगेश चिवटेंच्या भावावर जीवघेणा हल्ला; भाजप नेत्यानेच सुपारी दिल्याचा दावा
Solapur Shivsena : महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. आपल्यावर भाजप महिला नेत्या रश्मी बागल आणि त्यांचा भाऊ दिग्विजय यांनी हल्ला घडवून आणल्याचा आरोप महेश चिवटेंनी केलाय.
सोलापूर जिल्ह्यातचे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय. महेश चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंचे ज्येष्ठ बंधू आहेत. महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातला भाजप शिवसेना यांच्यातल्या अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या हल्ल्यामागे भाजपच्या महिला नेत्या रश्मी बागल यांचा हात असल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केलाय.