
Crores of hostel grants released without inspection in Solapur; irregularities from 2015–18 shock district.
Sakal
सोलापूर: २०१५-१६, २०१६-१७ व २०१७-१८ या तीन वर्षांतील वसतिगृहांची तपासणी करण्यात आली नाही. यामुळे वसतिगृहाचे अंतिम अनुदान देताना विद्यार्थी उपस्थिती नमूद करता येत नसल्याने अनुदान अंतिम करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची मागणी जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पुण्यातील समाज कल्याण आयुक्तांकडे मागणी केली होती. या पत्रावर आयुक्तांनी काय कार्यवाही केली, याबाबतचे कोणतेही पत्र लेखापरीक्षणासाठी उपलब्ध झाले नाही. शाळेची तपासणी न करता अनुदान कोणत्या आधारे वितरित करण्यात आले, सदर कालावधीची तपासणी झाल्याबाबतचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची मंजूर दैनंदिनी उपलब्ध नसल्याने अदा केलेली रक्कम योग्य व बरोबर असल्याची कागदपत्रे लेखापरीक्षणास उपलब्ध झाले नाहीत. यामुळे विद्यार्थी संख्या नसताना अनुदान वाटप कसे केले? यावर प्रश्नचिन्ह लेखापरीक्षण विभागाने उपस्थित केले आहेत.