esakal | अतिवृष्टीने बळीराजा कोलमडला! तरीही, बॅंकांकडून वसुलीची नोटीस अन्‌ महावितरणकडून वीजतोडणी
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer loan

वीजेची थकबाकी न भरलेल्यांचे कनेक्‍शन कापण्याचीही मोहीम सुरु असल्याने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती बळीराजाची झाली आहे.

अतिवृष्टीने बळीराजा कोलमडला! तरीही, बॅंकांकडून वसुलीची नोटीस

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: अतिवृष्टीमध्ये सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, जळगावसह जिल्ह्यातील हातातोंडाशी आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेली आहेत. त्या दु:खातून बळीराजा सावरतानाच बॅंकांनी आता त्यांना कर्जवसुलीची नोटीस बजावली आहे. त्यात विशेषत: कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील दोन लाखांवरील कर्जदारांचा समावेश आहे. दुसरीकडे वीजेची थकबाकी न भरलेल्यांचे कनेक्‍शन कापण्याचीही मोहीम सुरु असल्याने 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती बळीराजाची झाली आहे.

हेही वाचा: सोलापूर: 31 वर्षांत चौथ्यांदा भरला हिप्परगा तलाव

महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील 31 लाख 51 हजार शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. त्यातून जवळपास 21 हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले. मात्र, नियमित कर्जदारांना प्रत्येकी 50 हजार रुपये तर दोन लाखांवरील शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी देण्याची घोषणा होऊनही ती कागदावर आलेली नाही. कर्जमाफी मिळण्याच्या प्रतिक्षेतील बळीराजा आता कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. अगोदरच कोरोनाची परिस्थिती, शेतमालास दर नाही, अतिवृष्टी, महापूर या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा आता गळफासाची दोरी हाती घेऊ लागला आहे.

हेही वाचा: सोलापूर विभागांतील एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड धारकांना मिळणार लाभ

जानेवारी ते ऑगस्ट 2021 या काळात राज्यातील तब्बल एक हजार 605 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अडचणीची स्थिती असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कोरोनामुळे कर्ज वसुलीसाठी ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपताच बॅंकांनी शेतकऱ्यांना नोटीसीच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला आहे. अडचणीत सापडलेल्या बळीराजाला काही महिन्यांची सवलत मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हेही वाचा: पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस 17 ऑक्टोबर पर्यंत रद्द

ठळक बाबी...

- राज्यातील अंदाजित साडेतेरा लाख शेतकऱ्यांकडे दोन लाखांहून कर्जाची थकबाकी

- पिककर्जासह शेतीतारण कर्ज घेतलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना बॅंकांकडून वसुलीची नोटीस

- कर्जमाफीच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांसह तिन्ही वेळेला कर्जमाफी मिळालेल्यांना बॅंकांकडून कर्ज नाहीच

- आठ महिन्यात (जानेवारी ते ऑगस्ट) राज्यातील एक हजार 605 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

- अतिवृष्टीचा जवळपास दहा जिल्ह्यांना फटका; शासनाकडून मदतीची घोषणा नाहीच

पीक कर्ज घेऊन दोन वर्षे झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना वसुलीची नोटीस बजावली जाते. तत्पूर्वी, त्यांना स्मरणपत्र पाठवून थकबाकी भरण्यास सांगितले जाते. आता ज्यांनी कर्जाची थकबाकी भरलेली नाही, त्यांना बॅंकांकडून वसुलीची नोटीस देण्याची कार्यवाही सुरु आहे.

- प्रशांत नाशिककर, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर

loading image
go to top