esakal | बार्शीतील गणेशोत्सवावर कोरोनासह मंदीचे सावट
sakal

बोलून बातमी शोधा

BARSHI

बार्शीतील गणेशोत्सवावर कोरोनासह मंदीचे सावट

sakal_logo
By
प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : दरवर्षी शहरात गणेश उत्सवामध्ये शंभरपेक्षा अधिक मंडळे विविध पौराणिक,सांस्कृतिक,सामजिक देखावे तयार करुन गर्दी खेचताना पाहिले आहे पण यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली गणेश उत्सव शासनाच्या निकषानुसार साजरा करावयाचा असल्याने अगदी साधेपणाने 45 मंडळांनी गणेश मुर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. मुर्ती आणण्यासाठी ना गाजावाजा,ना कार्यकर्त्यांची फौज, ढोल,ताशे,बँड पथक,ट्रॅक्टर असा कोणताही डामडौल केला नाही पाच जणांनी मिळून टेम्पोतून गणेशमूर्ती घेऊन जाताना गणपती बप्पा मोरया असा जयघोष करीत आनंदोत्सव साजरा करुन गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली.

बैलपोळ्यापासून बाजारपेठेत गर्दी सुरु झाली होती शहरासह तालुक्यातील नागरिक मोठ्या उत्साहाने गणेश उत्सवाची तयारी करताना दिसत होते. पटेल चौक,पांडे चौक,गुळओळ रस्ता,दाणे गल्ली,फुलवाले चौक,पानखुंट चौक येथे धार्मिक साहित्य,हार,फुले,पाट,उपरणे,यासह गणेशमुर्ती सुशोभित करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांसह व्यापाऱ्यांचीही धांदल पहावयास मिळत होती.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

कोरोना संसर्गाची जागृती नागरिकांमध्ये दिसून आली गणेश मुर्ती खरेदीसाठी सर्वजण मास्कचा वापर करताना दिसून आले तर मुर्तीकारांनी दरवर्षीपेक्षा यावर्षी कोरोना सावटामुळे विक्री कमी झाली असल्याचे सांगितले. ग्राहकांची कोठेही गणेश मूर्ती खरेदीवेळी रांग अथवा गर्दी दिसून आली नाही पण लातूर रस्त्यावर गणेशमुर्तीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली.

शहरातील सर्व मंडळांची गणेश उत्सवापूर्वी बैठक आयोजित करुन पोलिस प्रशासनाच्यावतीने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना आरास,गर्दी होणार नाही असा कोणताही उपक्रम राबवू नये असे सांगितले होते त्यामुळे कोणत्याही मंडळाने सार्वजनिक उपक्रम राबविणार नसल्याचे जाहीर केले होते.

पाचपेक्षा अधिक जणांची गणेश मुर्तीच्या आरतीसाठी उपस्थिती ठेवू नका,सकाळी,संध्याकाळी वेगवेगळे नागरिक बोलावून आरती करा,किर्तन,देखावे,मुर्तीचे मुखदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन करा,गर्दी,नागरिकांच्या रांगा लागतील असे कार्यक्रम आयोजित करु नका तसेच कोणत्याही मिरवणूकीस परवानगी देण्यात आलेली नाही.

- रामदास शेळके, पोलिस निरीक्षक,बार्शी शहर पोलिस ठाणे

हेही वाचा: चिखलीचे वीर सुपुत्र अनंतात विलीन; हजारोंच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर राजस्थान येथून आणण्यात येते डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे गणेश मूर्तीच्या किंमतीत पंधरा टक्के वाढ यावर्षी झाली तर बाजारपेठेत गणेश मूर्ती विक्रीवर वीस ते तीस टक्के परिणाम झाला गणेश मुरर्तींची विक्री कमी झाली.

- राहूल उपरे,गणेशमूर्ती विक्रेते बार्शी.

कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे अन् शासनाच्या आदेशामुळे आम्ही यावर्षी अतिशय साध्या पध्दतीने गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे कोणाताही कार्यक्रम आयोजित केला नसून यावर्षी गणेश उत्सवासाठी कसलीही वर्गणी जमा केली नाही.

- पट्टम पवार,अध्यक्ष जवाहर गणेश मंडळ,भोसले चौक बार्शी.

गणेश उत्सवामध्ये वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच मैदानावरील नियोजित गाळ्यांमध्ये गणेशमुर्ती विक्रेत्यांसाठी परवानगी देण्यात आली होती.

- अमिता दगडे-पाटील मुख्याधिकारी,बार्शी नगरपरिषद

loading image
go to top