
पांगरी : सरकारी नोकरी लावतो, असे आमिष दाखवून १ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान बालाजी वट्टमवार (वय २५, रा. सुभाषनगर, बार्शी) असे फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.